marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

सोमवार, २९ डिसेंबर, २००८

डुंगरचे आदिवासी(पुढे चालू)

पानी आणायला लांब,डोंगर उतरून जाववायाचा नाय
पोटं रिकामी तोंड बी कोरडी ,असं फार दिवस चालायचं नाय
केलिच पायजेलकायतरी त्यांच्या पोटाची सय
पर एक दिवस मात्र ,शहरातला अण्णा आला
शेती नाय तारा नाय ,कायतरी उद्योग काढायला लागला
वेताच्या टोपल्याअन विणलेल्या चटाया
आठवड्याच्या बाजारात नेवून विकाया
तोडावी पानं अन कराव्या पत्रावली
करावे द्रोण सुबक आकार देवूनी
तेवढं विकून आजची गरज भागली
पन येनारया दिसावरही नजर रोकली
डोंगरच्या भवती चारा खणून काढले
पावसाचं पानी रोकण्यास नामी उपाय केले
आजवर आम्ही खूप कष्ट सोसलं
उद्याच सपान सुखाचा दिसाया लागला
म्हणा रे म्हणा सख्या हरी रंगा
आली रे आमच्या गावी विकासगंगा

डुंगरचे आदिवासी

आमची भूमाता आमच्यावर रागावली
आम्हीच पेरलेली बाजरी आम्हास ना गावली ।
दानं न्हई गावलं,झाडपाल्यावर रहाऊ,
देवाजीच्या किरपेची आम्ही वाट पाहू
आमचं एक राहील ,पण पोराबाळांच काय
त्यांचं वाढतं अंग, दान्याबिगर राह्यचं नाय.(अपूर्ण)

रविवार, २८ डिसेंबर, २००८

परले महोत्सवा(पुढे चालू )

तरदोन बक्षिसेही पटकावली
मी एवढे बोलतो तोच
अरे लाउडस्पीकर फार मोठ्याने वाजतोय
म्हणूनही पार्ले महोत्सव फार गाजतोय
माझी कविता एवढी काही चांगली नाही
म्हणूनच तीवाचायला मी लाजतोय

परले महोत्सवा

वर्ष संपता संपता पार्ले महोत्सव सुरु होतो

नवीन वर्ष संपेपर्यंत पुरेल एवढी

उत्साहाची बेगमी देवूनजातो

ह्या वेळेस मात्र कृष्णकुमार

नुसतीच मदत देव्वों नाही थांबले



बुधवार, २४ डिसेंबर, २००८

asheehi eka sunaameejuly26




ती एक त्सुनामी गतसाली
तशी यंदा मुंबैवरहीआली
आकाशातुनी एक सुनामी
अर्ध्या देवासाता हजार मी.मी।
पावसात बुडलीमुम्बापुरी
शतकाम्चा उच्चांककरी
तो पऊसकोसळता ऊरी
जोडलेली बेटे पुन्हा अलग करी
प्रथम तुटले दूरध्वनी नंतर भ्रमणध्वनी
आई मुलांना एकमेकांची काळजी
वाहतूक ठप्प होता
वाहने पाण्यात डुंबता
ऐ सी स्फोट होवूनी फूटती
वाहनंच्या काचा फूटती
जो तो खिळलेला आपुल्या जागी
रात्र उलटली दिवसही संपला
तरी घर न गाठले कोणी
अंधार होण्यापूर्वीच जाई वीज
थांबलेल्या जीवनाला अंधाराची तीट
होई दूरदर्शन थन्ड ,स्तब्ध आकाशवाणी
कोठे काय जाहले जगी , न जाणिले कोणी
अशी काळरात्र पुन्हा कधी न येवो
कोणाच्याही जीवाला असा घोर न लागो

मंगळवार, २३ डिसेंबर, २००८

त्सुनामी 2004

डळमळले भूमंडळ डचमळले सिन्धूजल
चतुष्पाद त्रुणचर ते झाले विचलित
द्विपाद विचारवंत,ते करती घराची खंत
जलाशयाची लाट अकस्मिक येता प्रलयंकर
कोसळता घर ,त्याखाली तडफडती मानव
प्राण्यांच्या मात्र कुणी सांगितले कानी
जीवा वाचवा डोंगरी जावूनी कोपली आहे धरणी
कुणास ठावूक नक्की कायझाले ते
पहिली भेग का तुला पडली गे धरनीमाते
सागरतळातच भेग होवूनी पाणी गेले खाली
लाव्हाच्या त्या तप्त रसाची झाली लाही लाही
गेले त्याच्या शतपट वेगे उसळुनी आले पाणी
म्हणता म्हणता अक्रमली पाण्याने अवघी धरणी
झाले गेले होवूनी गेले, करा आता मलमपट्टी
अनाथ ,दू:खी ,ह्यांनी भरली अवघी किनारपट्टी
आजवरी अनेक वेला जगी या घडला उत्पात
तरीही जीवन चालता आले ,तसेचा अखंडीत
धावून आले जगा सारे घेऊनी मदतीचा हात
फिनिक्स पक्ष्यापरी राखेतूनीही उठेल मानवजात

सोमवार, २२ डिसेंबर, २००८

पहांट्वारा/सांजवारा

पहांट्वारा
हां मंद पहांटवारा
हलकेच करीत जागा
कल्पनाविश्वाचा पसारा
कुणीतरी फुलवून सांगा
त्याची पाकळी पाकळी जगाला
काव्याची ही प्रतिभा
अशिचहवी फुलाया
सांजवारा
मन्द मन्द शांत शांत
गात गीत सांजवारा
गंध रातराणीचा न्यारा
करी धुंद आसमंत सारा

पहांट्वारा/सांजवारा

पहांटवारा

हां मंदा

शनिवार, २० डिसेंबर, २००८

प्रेमगीत

ह्रुदयात माझ्या खोल, प्रीतीचे तुझिया बोल
लेवुनी ष्रुंगार साज लपले आहेत आज।

ऐकण्या तयांचे गान, लावशील ज़रा कान
पाहुनी लवलेली मान, धडधडे हृदय सान

रुलाता तुझा गजरा ,सुगंधी माझ्या छातीवरी , थरथर उठे शरीरी, मोह न मजला आवरी
म्हणुनी लिहितो गीत ,वाचुनी ठेव मनात, स्फुरेलत्या त्या कली,गाई ह्या गोड ओळी

गुरुवार, १८ डिसेंबर, २००८

कन्या माझी लाडकी

कविता आहे माझी कन्या ,हवी तर तिला सासरी न्या
पण एवढी तरी कृपा करा ,एक दिवास तरी द्या माहेरा !

मला प्रिय आहे तिची गोड छबी ,परकर पोलका अन घट्ट वेणीतली
वेणीत वेणी फुलांची अन त्यात करवंदे,तुम्हाला वाटेल गावठी तर वाटू दे।

सासरी तुम्ही तिला कशीही नटवा,व्रुताम्चा ड्रेस नाहीतर चालीची साडी नेसवा
झोपाळ्यावरझुलवा नाहीतर मखरातबसवा ,माहेरची सययेता येवू नयेत आसवा।

एवढे मात्र माझ्यासाठी अवश्य करा,माहेरी कसाही वागण्याचा चेक द्या कोरा।
माझ्या अलबममध्ये रहावा मुळचा चेहरा .म्हणून एक दिवस तरी द्या माहेरा

शनिवार, १३ डिसेंबर, २००८

वादळाची रात

वाट पहाते, डोळ्यांची बाहुली मोठी करू --नी
मी तुझी रे -- सखया--किती
शीडाचा फड़का --रा दिसेल कोठे का
उसल्त्या ह्या -- दरिया --तुनी
रात वाद --ळी, बावटा तीन नंबराचा तो लागलेला
रेडियो सतत धोक्याची सू --चना घोषित असता --ना
जावू नको रे --मासं धरण्या ला
आशा भयाण राती--ला --रे --

रविवार, ७ डिसेंबर, २००८

चंद्र आणि भूमी

पुनावेला कोजागिरी,पहावी चंद्राची निळाइ
जशी संतानी पाहिली सावळ्या विट्ठलाचे ठाइ
पूर्ण चंद्राचे चांदणे मना करी शांत शांत
जन शिवाची भजने भावाभाक्तीने गातात
अश्विनाच्या शुद्ध पक्षी ,अंती येते कोजागिरी
कोणी म्हणे शरद पोरणीमा,,शिवदूतांची येते फेरी
कोजागर्ती कोजगर्ती, त्यांची एकच आरोळी
भजानांत जाई विरोनी.निजलेले नसों कोणी।
जागा असू दया बंधो तुमच्या तनाची व मनीची
भूमी व्यापण्या मग तुमची माय व्याली कुणाची

गुरुवार, ४ डिसेंबर, २००८

खंत

चाल-नीली नीली अम्बर पे
जनामानसी माझी ,प्रतिमा असे केवलशून्य
तुझ्यावाचुन मला। नव्हता कुणी मित्रही अन्य
सगे सोयरे सारे,होत्दे केवलनिमित्तमात्र
कामापुराते मामा ,अन ताकापुराते काका,तेही सरल सत्र
तू जाता सोडुनी ,जगअवघे झाले शून्यवत
mआणसांनी भरल्या नगरीतहीनाही कोणाची संगत।ksध्येय गेले विसरुनी ,कळेनाकाय जीवनाचे इप्सीत
कशासाठी बसलो मी दिवासाम्चे धडे उपसता
सांगेल काकूनी माला,जीवंत का अजूनही मी
माझ्या वाटेला आहे का ,अजून काही कार्य नामी