बुधवार, २४ डिसेंबर, २००८
asheehi eka sunaameejuly26
ती एक त्सुनामी गतसाली
तशी यंदा मुंबैवरहीआली
आकाशातुनी एक सुनामी
अर्ध्या देवासाता हजार मी.मी।
पावसात बुडलीमुम्बापुरी
शतकाम्चा उच्चांककरी
तो पऊसकोसळता ऊरी
जोडलेली बेटे पुन्हा अलग करी
प्रथम तुटले दूरध्वनी नंतर भ्रमणध्वनी
आई मुलांना एकमेकांची काळजी
वाहतूक ठप्प होता
वाहने पाण्यात डुंबता
ऐ सी स्फोट होवूनी फूटती
वाहनंच्या काचा फूटती
जो तो खिळलेला आपुल्या जागी
रात्र उलटली दिवसही संपला
तरी घर न गाठले कोणी
अंधार होण्यापूर्वीच जाई वीज
थांबलेल्या जीवनाला अंधाराची तीट
होई दूरदर्शन थन्ड ,स्तब्ध आकाशवाणी
कोठे काय जाहले जगी , न जाणिले कोणी
अशी काळरात्र पुन्हा कधी न येवो
कोणाच्याही जीवाला असा घोर न लागो
मंगळवार, २३ डिसेंबर, २००८
त्सुनामी 2004
डळमळले भूमंडळ डचमळले सिन्धूजल
चतुष्पाद त्रुणचर ते झाले विचलित
द्विपाद विचारवंत,ते करती घराची खंत
जलाशयाची लाट अकस्मिक येता प्रलयंकर
कोसळता घर ,त्याखाली तडफडती मानव
प्राण्यांच्या मात्र कुणी सांगितले कानी
जीवा वाचवा डोंगरी जावूनी कोपली आहे धरणी
कुणास ठावूक नक्की कायझाले ते
पहिली भेग का तुला पडली गे धरनीमाते
सागरतळातच भेग होवूनी पाणी गेले खाली
लाव्हाच्या त्या तप्त रसाची झाली लाही लाही
गेले त्याच्या शतपट वेगे उसळुनी आले पाणी
म्हणता म्हणता अक्रमली पाण्याने अवघी धरणी
झाले गेले होवूनी गेले, करा आता मलमपट्टी
अनाथ ,दू:खी ,ह्यांनी भरली अवघी किनारपट्टी
आजवरी अनेक वेला जगी या घडला उत्पात
तरीही जीवन चालता आले ,तसेचा अखंडीत
धावून आले जगा सारे घेऊनी मदतीचा हात
फिनिक्स पक्ष्यापरी राखेतूनीही उठेल मानवजात

सोमवार, २२ डिसेंबर, २००८
पहांट्वारा/सांजवारा
पहांट्वारा
हां मंद पहांटवारा
हलकेच करीत जागा
कल्पनाविश्वाचा पसारा
कुणीतरी फुलवून सांगा
त्याची पाकळी पाकळी जगाला
काव्याची ही प्रतिभा
अशिचहवी फुलाया
सांजवारा
मन्द मन्द शांत शांत
गात गीत सांजवारा
गंध रातराणीचा न्यारा
करी धुंद आसमंत सारा
हां मंद पहांटवारा
हलकेच करीत जागा
कल्पनाविश्वाचा पसारा
कुणीतरी फुलवून सांगा
त्याची पाकळी पाकळी जगाला
काव्याची ही प्रतिभा
अशिचहवी फुलाया
सांजवारा
मन्द मन्द शांत शांत
गात गीत सांजवारा
गंध रातराणीचा न्यारा
करी धुंद आसमंत सारा
शनिवार, २० डिसेंबर, २००८
प्रेमगीत
ह्रुदयात माझ्या खोल, प्रीतीचे तुझिया बोल
लेवुनी ष्रुंगार साज लपले आहेत आज।
ऐकण्या तयांचे गान, लावशील ज़रा कान
पाहुनी लवलेली मान, धडधडे हृदय सान
रुलाता तुझा गजरा ,सुगंधी माझ्या छातीवरी , थरथर उठे शरीरी, मोह न मजला आवरी
म्हणुनी लिहितो गीत ,वाचुनी ठेव मनात, स्फुरेलत्या त्या कली,गाई ह्या गोड ओळी

गुरुवार, १८ डिसेंबर, २००८
कन्या माझी लाडकी
कविता आहे माझी कन्या ,हवी तर तिला सासरी न्या
पण एवढी तरी कृपा करा ,एक दिवास तरी द्या माहेरा !
मला प्रिय आहे तिची गोड छबी ,परकर पोलका अन घट्ट वेणीतली
वेणीत वेणी फुलांची अन त्यात करवंदे,तुम्हाला वाटेल गावठी तर वाटू दे।
सासरी तुम्ही तिला कशीही नटवा,व्रुताम्चा ड्रेस नाहीतर चालीची साडी नेसवा
झोपाळ्यावरझुलवा नाहीतर मखरातबसवा ,माहेरची सययेता येवू नयेत आसवा।
एवढे मात्र माझ्यासाठी अवश्य करा,माहेरी कसाही वागण्याचा चेक द्या कोरा।
माझ्या अलबममध्ये रहावा मुळचा चेहरा .म्हणून एक दिवस तरी द्या माहेरा

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)