marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

रविवार, २६ एप्रिल, २००९

होळीची प्रथा (एक काल्पनिक

असुरासही न्यात होइ सर्व देव ब्रह्मासि
भक्तितुनी शक्ती मिळे जाउनी मग आळविति
तपातुनी सामर्थ्य मिळे सोडव ह्या त्रासातुनी
तिन्ही लोक जिंकण्यास करिति त्याला विनती।
एकच हा मार्ग असे ब्रह्मदेव प्रगटुनी
एकच हा मार्ग असे तपोभूमीवर येती
ढोन्ग करुन भक्तिचे असुराला थोपवुनी
तो तप करण्या बसे आशीर्वचनाला देति
नामस्मरण ब्रह्माचे "का कष्टसी सांग असा,
उच्चारत सतत बसे काय हवे तुज वत्सा
गेली वर्षामागुनी वर्षे माग आता सत्वरी
तपोबल अधिकाधिक ते प्रसन्न मी तुजवरी"
होवूनी जड प्रुथ्वीला ऐकुनी ते बोल मधुर
आकाशा जाळीतसे उल्हसित मनी असुर
सांगे की ह्या भूवर (भाग २ पहा)

बुधवार, १५ एप्रिल, २००९

प्रीतीसागर

सागराच्या लाटा
धरतीला स्पर्शती प्रेमभावे
फेस सफेत उफाळे
मनीच्या प्रीतिचे जणू
धरती परी प्रतिसाद न देई
लाज वाटते तिला नभाची
लाजेची परी तिच्याच लाली
उठून दिसते क्षितिजावरती
जसा सूर्य आपुले तोंड लपवी
नगाआड वा पाण्याखाली

शुक्रवार, १० एप्रिल, २००९

विनायक दामोदर सावरकर

शिक्षण घेण्या अनेक हिंदी विलायतेस गेले
बरेचजण त्यांपैकी परी ,मातृप्रेमास मुकले
एक असा विनायक त्यांपैकी जे देशप्रेमी ठरले,
राष्ट्राला समर्थ करण्यासाठी कटिबद्ध जाहले ।
क्रांतिज्योत पेटविण्या पुस्तकातुनी पिस्तूल पाठविले
धूर्त अशा आंग्लांच्या नजरेतुनी नच सुटले
शिक्षा काळ्या पाण्याची झाली,कष्ट किती भोगले
शरीर जर्जर झाले परे मन दुबळे नच झाले
युद्ध सुरु होता तरुणांस भरती होण्या सुचविले
भारत उद्याचा समर्थ व्हावा ,ह्या एकाच उद्देशाने
शिक्षा संपुनी घरी परतता स्वस्थ नाही बसविले
पतित पावन मंदिर बांधले ,जातिभेद मिटविले
राजकारण असे घडले ,क्षण एक लोक त्यांना विसरले
राष्ट्रप्रेम तरीही त्यांचे मुळी न ओसरले
आज तयांच्या पुण्यातिथीला पुन्हा स्मरु त्यांना
दिव्य भव्य त्या राष्ट्रभक्तीला देवू मानवंदना

शनिवार, ४ एप्रिल, २००९

कोंकणचा मेवा

टीप :-कोंकण हे नैसर्गिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकास पावत आहे ,बालांना त्याचे आकर्षण कसे वाटेल ह्यासंबंधी एक विचार ।
गावारानीचा हां मेवा
काजूकंदाचा घ्यावा
बालागोपाला वाटावा
जिवेभावे ,
हापूस आंब्याकडे मात्र
नुसतेच बघावे
मोठ्या आशेने

शुक्रवार, ३ एप्रिल, २००९

नव्या शतकाच्या अपेक्षा (मिलेनीयम)

पहांतेचेवाजले चार ३१स्त दीसेम्बर 1999
चोरीस गेली आमची कार
झाडावरचे कावळे चार
ओरडू लागले कार कार
विसाव्या शतकातले कावळे हुशार
बोलत नाहीत नुसते काव काव
बदलले पाहिजे त्यांचे नाव ।
एकविसाव्या शतकातले त्याहून गुणी
काय काय बोलतील सांगावे कुणी
कार दिसताच म्हणतील कदाचित
स~म्त्रो स~म्त्रो ,मातीझ मातीझ

मंगळवार, ३१ मार्च, २००९

नोट सो ओल्ड ,एक आठवला म्हणुन

घरी परतता प्रसन्न मन हो अंत नुरे मम हर्षा
पहाता स्मित हास्य वदनी प्रियेच्या नाव तियेचे वर्षा
सवाल जवाब
मिरचित मिरची रेडियो मिरची
तिखट नव्हे गोड, वर्षा आमची
वर्षा:- रेडिओत रेडियो ओल इंडिया रेडिओमध्ये
माझ्या नावाची पब्लिसिटी ,करती हेमंत आमचे

रविवार, २९ मार्च, २००९

chaaMdrayaan2008

झेपावले चंद्राकडे यान आज भारताचे
पूर्णपणाने यश मिळविले इस्रोने साचे
तीन ध्वज आजवरी फदकले तीन राष्ट्राम्चे
सांगेल तिरंगा सख्य असावे सर्व मानावाम्चे