marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

सोमवार, ७ डिसेंबर, २००९

त्सुनामी

डळमळले भूमंडळ डचमळले सिंधूजल
चतुष्पाद तृणचर ते झाले विस्चलित
द्विपाद विचारवन्त,करती घराची खंत
जलाशयाची लाट अकस्मिक येता प्रलयंकर
कोसळता घरं,त्याखाली तडफडते मानव
प्राण्यांच्या मात्र कुणी येउनी सांगितले कानी
जीव वाचवा डोंगरी जाउनी कोपली आहे धरणी
कुणास ठाऊक काय कैसे झाले ते
पहिली भेग का पडली तुला गे धरणीमाते?
सागरतळातचभेग होवूनी पाणी गेले खाली
लाव्हाच्या त्या तप्त रसाने झली लाही लाही
गेले त्याच्या शतपट वेगे उसळुनी आले जलही
म्हणता म्हणता आक्रमली पाण्याने अवघी धरणी.
झाले गेले हौनी गेले,करा आता मलमपट्टी
अनाथ,दु:खी, ह्यांनी भरली अवघी किनारपट्टी
तरीही जीवन चालत आले,तसेच अखंडित
धावून आले जग सारे घेउनी मदतीचा हात
फिनिक्स पक्ष्यापरी राखेतूनही उठेल मानवजात.

मंगळवार, १ डिसेंबर, २००९

द्वंद्व

हा जीव जोवरी जगतोहे
तोवरी मन शरीरी गुंतुनी राहे
आजवरी केली बंडखोरी अशी
मांडिला उभा दवा शरीराशी
शरीर पण हे इतुके हट्टी
मनशी धरली तयाने कट्टी
कधी घ्यावी मनाने उभारी
तर शरीर जणू त्याचे वैरी
कधी शरीरावरी येइ शहारा
कधी’तेरे यादने मारा’
मन घाली देहा लगाम"
हे पाप,इथे तुझे काय काम?"
असे दोघांचे चाले रणकंदन
परी होणार नाही विभाजन

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

ससा आणी फक्त ससाच

एक होता ससा
सांगा पाहू कसा?
पांढरा पांढरा रंग
अन मवू मवू अंग
मोठे मोठे कान
लाल लाल डोळे छान
काय बरे खातो?
लठ्ठ मात्र दिसतो
असा हा ससा
धीट नाही तसा
चाहूल लागता पळतो
झाडाझुडपात लपतो
तुरुतुरु ह्याची चाल
पहाल तर थक्क व्हाल
असा हा ससा
ह्याला खूप खूप हसा

रविवार, १ नोव्हेंबर, २००९

उत्तराचा डेटा

उत्तराचा डेटा तुम्ही मला आणा बाबा
प्रश्नांचे उन बाई,
डोके तापवून जाई
करा तुम्ही माझ्यावरी सोल्युशनची वर्षा
नाही जाग नाही श्रम
परी होई टेंशन
सेलशिवाय चालेल का मोबाइल माझा
कंपासपेटीत गुपचुप
मोबाइल झाला बंद
चिप त्यात मी सारावी ,अशी करा माया

उत्तराचा

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २००९

नविन काही सुचावे

आज मला वाटे,माझ्या नशिबी केवळ काटे
एक सोबत होती प्रतिभेची पहाटे पहाटे
तीही सोडून जाता वाटे मला एकटे एकटे
प्राणी आणी वृक्षवल्ली ह्यांतही माझे कोणी नसते ।

लिहू काय अन कसा चाले ना लेखणी
लिहिले तरी वाचक मिळे ना कोणी
प्रकाशक आणी मुद्रक वगैरे तर राहिले दूर
तूच आता परमेश्वरा नेइनास का दूर

बुधवार, ३० सप्टेंबर, २००९

सुवर्णजयंती सोसायातीची

ह्या नवनवीन मनमीलनोत्सवा
भाषेत असावा थोडा गोडवा
ओसरेल मग परस्परातील दुरावा
गृहसंस्था केवल नव्हे, मैत्रीकट्टाच व्हावा