marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

रविवार, २४ जानेवारी, २०१०

रविवारची दुपार

रवीवारची दुपार
आळसाला नाही पार
गृहकामे अपरंपार
आटोपता,आडवी दुपार
उभी करोनी उठावे
कॉम्पुटर वर बसावे
ईमेल कंटाळवाणी
लिहिताना माझी वाणी
झोपेतल्यासाराखी बरळते
रद्दी कविता गरळते
नका तुम्ही पुढे वाचू
चावल्यागत होइल विंचू
मागे होवून सटकनी
लावा टीव्ही वर मॅटीनी
झोपून उठेल गृहिणी
तेव्हां मात्र मंडळी
जरूर न्या चौपाटीवर
ताव मारा भेळपुरीवर
नहीतर न केवळ रविवार
आठवडा फुकट गेला ना यार!

मंगळवार, १२ जानेवारी, २०१०

कशासाठी पोटासठी

नाही पारसिकचा बोगदा,न वा खंडाळ्याचा लपंडाव
पूर्वीच्या प्रवासात बोगदायेतां,गाडी बुडे काळोखांत
झुकझुक घादीची गंमत नही हायवेच्या प्रवासात
हायवेवरून बस जाता,आता बोगद्यांतही झगझगाट
देशभर सगळीकडे असतो हल्ली विजेचा तुटवडा
बोगद्यांसठी कोठून होतो,चोवीस तास पुरवठा?
पर्वतातली झाडी राखून ब्रिटिशांनी केला होता रेलमार्ग
खंडाळा लोणावळा येथे होते महाराष्ट्राचे गुलमर्ग
आतां मात्र डोंगर तोडून, सपाट रस्ते अन रखरखाट
श्रीमंतांना जयला हवे उद्योगनगरी पुण्यास,विरून गेला निसर्ग
कृष्णकुमार

सोमवार, २१ डिसेंबर, २००९

चुकलेली वाट

चांद्रयान एकदा वाट की हो चुकले
तिथी पाहिल्याविना सुटले ,चंद्रकक्षा ओलांडुनी गेले
दिवस रात्र हे भेद नाही उरले
पाहती रडारचे डोळे तो अद्भुत द्रष्य दिसले
काळ्या मखमली चादरीवरी असंख्य तारे चमचमले
नव्हती घेतली सी डी अर्व ग्रहांच्या वेळापत्रकांची
जेथे जावे तेथे ग्रहांची चुकामूक व्हावयाची
असे होता यानास त्या शनी दिसला
उपग्रहांच्या घोळक्याने पूर्ण वेढलेला
आता पाहू प्रत्यक्ष तेज त्या शनीचे
नमुनी त्याला वर्णू या प्रेम धरतीचे
परी भोवती फिरणारे उपग्रह अडवती याना
म्हणती अशनि हा कोण इथे घुसला
जा सांग जावूनी जिथुनी आला त्या अवनीला
शनी तुजशी धरत आहे पूर्ण अबोला
पुत्र तिचे स्तवतात सदा चंद्राला
आहे का एक माइचा लाल नावाजत शनीला
एक तो कृष्ण ज्यने अढळ म्हणुनी धृवावर काव्य केले
मंगेश दुसरा ज्याने शुक्रतारा गीत ऐकविले
ऐकण्याला पुढे काही ते यान थांबले ना
अर्धवृत करुनी अवनीवरी परतले बा.

सोमवार, १४ डिसेंबर, २००९

prasavavedanaa

प्रसववेदना
शंत नीरव पहांटेची वेळ असावी
लेखणी घेऊनी हाती सिद्ध होइ कवी
अशा समयी हाय परंतु जागते मुंब ई
हाती घेवोनी बाटली चालते आकृती मानवी
उद्यान असो,मैदान असो,प्रातर्विधीला जागा हवी
निषेधाचे सूर उठती भटक्या श्वानांच्या करवी
रक्षक कायद्याचे जणू त्यांच्याविना दुजे न कोणी
असतील जरी,निद्रिस्त तरी,पगार घेती जरी.
कविता प्रसविता प्रसविता अबॉर्शन की जाहले
कशी होइल लयबद्ध, नको ते शब्द मध्ये अडमडले

सोमवार, ७ डिसेंबर, २००९

त्सुनामी

डळमळले भूमंडळ डचमळले सिंधूजल
चतुष्पाद तृणचर ते झाले विस्चलित
द्विपाद विचारवन्त,करती घराची खंत
जलाशयाची लाट अकस्मिक येता प्रलयंकर
कोसळता घरं,त्याखाली तडफडते मानव
प्राण्यांच्या मात्र कुणी येउनी सांगितले कानी
जीव वाचवा डोंगरी जाउनी कोपली आहे धरणी
कुणास ठाऊक काय कैसे झाले ते
पहिली भेग का पडली तुला गे धरणीमाते?
सागरतळातचभेग होवूनी पाणी गेले खाली
लाव्हाच्या त्या तप्त रसाने झली लाही लाही
गेले त्याच्या शतपट वेगे उसळुनी आले जलही
म्हणता म्हणता आक्रमली पाण्याने अवघी धरणी.
झाले गेले हौनी गेले,करा आता मलमपट्टी
अनाथ,दु:खी, ह्यांनी भरली अवघी किनारपट्टी
तरीही जीवन चालत आले,तसेच अखंडित
धावून आले जग सारे घेउनी मदतीचा हात
फिनिक्स पक्ष्यापरी राखेतूनही उठेल मानवजात.

मंगळवार, १ डिसेंबर, २००९

द्वंद्व

हा जीव जोवरी जगतोहे
तोवरी मन शरीरी गुंतुनी राहे
आजवरी केली बंडखोरी अशी
मांडिला उभा दवा शरीराशी
शरीर पण हे इतुके हट्टी
मनशी धरली तयाने कट्टी
कधी घ्यावी मनाने उभारी
तर शरीर जणू त्याचे वैरी
कधी शरीरावरी येइ शहारा
कधी’तेरे यादने मारा’
मन घाली देहा लगाम"
हे पाप,इथे तुझे काय काम?"
असे दोघांचे चाले रणकंदन
परी होणार नाही विभाजन

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

ससा आणी फक्त ससाच

एक होता ससा
सांगा पाहू कसा?
पांढरा पांढरा रंग
अन मवू मवू अंग
मोठे मोठे कान
लाल लाल डोळे छान
काय बरे खातो?
लठ्ठ मात्र दिसतो
असा हा ससा
धीट नाही तसा
चाहूल लागता पळतो
झाडाझुडपात लपतो
तुरुतुरु ह्याची चाल
पहाल तर थक्क व्हाल
असा हा ससा
ह्याला खूप खूप हसा