marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शुक्रवार, ३० जानेवारी, २००९

हे कोण इथे निजलेले

दगडाच्या उशीला धुळीची खोळ ना
भूमीला बसे हादरा ,नियती हलवी पाळणा
सल्असळ पानांची होते, वारा गातो पाळ णा
रातराणीचे फुले डंवरती, त्यांची होते माळ ना
लुकलुकचाम्दान्या तय जणू डोळे मिचाकावती
तेवढ्याने का कोठे झोपा बाळांच्या उड़ती
जडावले डोंगर ,पापणीवरी केस गवतांचे
एकमेका भेटती ,गळामिठी सुटेल ना त्यांची
रात्र परी संपता संपता ,दव कोणीशिंपडले,
थेंबे पापणी ओलावता ,डोळे हळूच उघडले
सूर्यकिरण सोनेरी दिसता तेही चमकले
किलबिल पक्ष्यांची सारया ऐकुनी कोणी हेलावले
निद्रित होती सारी सृष्टी ,नव्हती कसली भीती
उजाडताना परी म्हणाली,भ्याले बाई मी किती
बाळे माझी दिसेनात ती,काय केले उपद्व्याप
धूर आकाशाला भिडतो ,जळतेमाता ,दू:खी बाप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: