marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

गुरुवार, २५ जून, २००९

हुरलून नाही गेलो (रामबाणवर)

पाठ थोपटून घेतानाही थरथर जाणवते
थोपटणा-या ची अंगठी खङा जणू रुपवाते
कविता भन्नट आहे,आवडली आपल्याला
असे म्हणणा-या चा एक डोला मिटलेल्ला
त्याची द्रष्टी संकुचित तर नाही ना
ही काळजी लागून राहते मना
श्रोत्यावर मनापासून प्रेम असते ना
म्हणूनच काळजी,जशी मुलांची आयांना
उपदेश कुठलाही करत नाही त्याला
पण एक सांगतो त्याचा विचार भला
दोन्ही डोळ्यांनी पहाल तर नीट दिसेल
समोरच्या वस्तूचे मोजमाप काय असेल
कवि पृथ्वीकडे पहातो एक आई म्हणून
तसेच कल्पना चावला सारखा दुरून दुरून
मराठीत ग्रह सारे आहेत पुल्लिंगी
पण पृथ्वी एकटीच स्त्रीलिंगी
म्हणून तिची तुलना केली स्त्रीशी
केली तर कुठे शिंकली माशी
पण हेही खरेच आहे
की स्त्री ही माता आहे
म्हणूनच ती पूज्य आहे
हे विसरले तर मात्र सारेच पूज्य आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: