marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शुक्रवार, १९ मार्च, २०१०

bhashabharati: मीही अनामिका (ई टी व्ही ची क्षम

bhashabharati: मीही अनामिका (ई टी व्ही ची क्षम

मीही अनामिका (ई टी व्ही ची क्षमा मागून)

मी जन्मभराची दासी
फुकटातच झाले तुमची
नांव नुसते तुमचे देउनी
तुम्ही वंशवेल वाढविली.
मम मुलीचे भाग्य उजळावे
तिज मुळी न कष्ट पडावे
डोळ्यातील पाणी अडवुनी
मम हात हाती दिधले
सर्वस्वच हरवुनी बसले
नांवही माझे गेले
मी पुरती तुमची झाले
आयुष्य तुम्हा वाहियले
एकच तुमच्या प्रेमासाठी
लागले मी तुमच्यापाठी
झाले--अनामिका

रविवार, १४ मार्च, २०१०

देव कोठे आहे?

सकाली उठोनी देवासी भजावे
ऐसे पूर्वजाम्नी साम्गितालेले
देव दिसेनात राजेवारी गेले
म्हणून संगणकी देवा शोधितो
संगणकसुद्धा धड न चालीतो
तूटक अक्शरा कधी तो छापितो
लेखन हे माझे तुम्हाला दावीतो
योग्य मार्ग मज दाखवा तो.

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

आशा

उतारवयात सहेली
आपल्याला सोडून गेली
तर लग्नाचा विचार
जसा कर्ता येत नाही
तसच प्रतिभा मनातून
जर का उडून गेली तर--
आशाढात मेघांनी
जगाला घट्ट गवसणी
घतल्यावर प्रकाशाची
तिरिप दिसण्याची आशा
नसते तशीच मनाला उभारी
येण्याची आशाही मावळ्ते
पण न जाणो,कधीतरी
लख कन वीज चमकेल
अणि एखादी तरी
चमचमणारी विद्युत रेखा
आसमंत उजळून टाकेल
ह्याच आशेवर उरलेल
जीवनाता व्यतीत
करयला हव आणी
ती आशा मात्र जिती
ठेवायलाच हवी.हवी ना?

रविवार, २४ जानेवारी, २०१०

रविवारची दुपार

रवीवारची दुपार
आळसाला नाही पार
गृहकामे अपरंपार
आटोपता,आडवी दुपार
उभी करोनी उठावे
कॉम्पुटर वर बसावे
ईमेल कंटाळवाणी
लिहिताना माझी वाणी
झोपेतल्यासाराखी बरळते
रद्दी कविता गरळते
नका तुम्ही पुढे वाचू
चावल्यागत होइल विंचू
मागे होवून सटकनी
लावा टीव्ही वर मॅटीनी
झोपून उठेल गृहिणी
तेव्हां मात्र मंडळी
जरूर न्या चौपाटीवर
ताव मारा भेळपुरीवर
नहीतर न केवळ रविवार
आठवडा फुकट गेला ना यार!

मंगळवार, १२ जानेवारी, २०१०

कशासाठी पोटासठी

नाही पारसिकचा बोगदा,न वा खंडाळ्याचा लपंडाव
पूर्वीच्या प्रवासात बोगदायेतां,गाडी बुडे काळोखांत
झुकझुक घादीची गंमत नही हायवेच्या प्रवासात
हायवेवरून बस जाता,आता बोगद्यांतही झगझगाट
देशभर सगळीकडे असतो हल्ली विजेचा तुटवडा
बोगद्यांसठी कोठून होतो,चोवीस तास पुरवठा?
पर्वतातली झाडी राखून ब्रिटिशांनी केला होता रेलमार्ग
खंडाळा लोणावळा येथे होते महाराष्ट्राचे गुलमर्ग
आतां मात्र डोंगर तोडून, सपाट रस्ते अन रखरखाट
श्रीमंतांना जयला हवे उद्योगनगरी पुण्यास,विरून गेला निसर्ग
कृष्णकुमार

सोमवार, २१ डिसेंबर, २००९

चुकलेली वाट

चांद्रयान एकदा वाट की हो चुकले
तिथी पाहिल्याविना सुटले ,चंद्रकक्षा ओलांडुनी गेले
दिवस रात्र हे भेद नाही उरले
पाहती रडारचे डोळे तो अद्भुत द्रष्य दिसले
काळ्या मखमली चादरीवरी असंख्य तारे चमचमले
नव्हती घेतली सी डी अर्व ग्रहांच्या वेळापत्रकांची
जेथे जावे तेथे ग्रहांची चुकामूक व्हावयाची
असे होता यानास त्या शनी दिसला
उपग्रहांच्या घोळक्याने पूर्ण वेढलेला
आता पाहू प्रत्यक्ष तेज त्या शनीचे
नमुनी त्याला वर्णू या प्रेम धरतीचे
परी भोवती फिरणारे उपग्रह अडवती याना
म्हणती अशनि हा कोण इथे घुसला
जा सांग जावूनी जिथुनी आला त्या अवनीला
शनी तुजशी धरत आहे पूर्ण अबोला
पुत्र तिचे स्तवतात सदा चंद्राला
आहे का एक माइचा लाल नावाजत शनीला
एक तो कृष्ण ज्यने अढळ म्हणुनी धृवावर काव्य केले
मंगेश दुसरा ज्याने शुक्रतारा गीत ऐकविले
ऐकण्याला पुढे काही ते यान थांबले ना
अर्धवृत करुनी अवनीवरी परतले बा.