शुक्रवार, १९ मार्च, २०१०
मीही अनामिका (ई टी व्ही ची क्षमा मागून)
मी जन्मभराची दासी
फुकटातच झाले तुमची
नांव नुसते तुमचे देउनी
तुम्ही वंशवेल वाढविली.
मम मुलीचे भाग्य उजळावे
तिज मुळी न कष्ट पडावे
डोळ्यातील पाणी अडवुनी
मम हात हाती दिधले
सर्वस्वच हरवुनी बसले
नांवही माझे गेले
मी पुरती तुमची झाले
आयुष्य तुम्हा वाहियले
एकच तुमच्या प्रेमासाठी
लागले मी तुमच्यापाठी
झाले--अनामिका
फुकटातच झाले तुमची
नांव नुसते तुमचे देउनी
तुम्ही वंशवेल वाढविली.
मम मुलीचे भाग्य उजळावे
तिज मुळी न कष्ट पडावे
डोळ्यातील पाणी अडवुनी
मम हात हाती दिधले
सर्वस्वच हरवुनी बसले
नांवही माझे गेले
मी पुरती तुमची झाले
आयुष्य तुम्हा वाहियले
एकच तुमच्या प्रेमासाठी
लागले मी तुमच्यापाठी
झाले--अनामिका
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा