marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

गुरुवार, २ जुलै, २००९

तूच माझा naatewaaik

तूच माझा नातेवाईक
जुळले नाते
परमेश्वराशी
खातो मी तुपशी
तरी मी उपाशी
तहान भक्तिची
काही केल्या भागेना
त्य महान शक्तिची
गांठ काहे पडेना
तूप चिकटे घशाला
नाक नकटे चालेना
कंठ आवाज देइना
घेऊ कसे रामनामाला
मन जुळले तुझ्याशी
जुळले नाते परमेश्वराशी

मंगळवार, ३० जून, २००९

कन्या माझी लाडकी

कविता आहे माझी कन्या
हवी तर तिला सासरी न्या
पण एवढी तरी कृपा करा
एक दिवस तरी द्या माहेरा[[
मला प्रिय आहे बालपणची छबी
परकर पोलका अन घट्ट वेणीतली
वेणीत वेणी फुलांची, त्यांत करवंदे
तुम्हाला वाटेल गावठी तर वाटू दे।
सासरी तिला तुम्ही कशीही नटवा
व्रुताचा ड्रेस नाहीतर चालीची सडी नेसवा
झोपाळ्यावर झुलवा किंवा मखरात बसवा
माहेरची सय येता तिने गाळू नयेत आसवा
माहेरी मात्र कसाही वागण्याचा चेक द्या कोरा
माझ्या आठवणीत रहावा तिचा मुळचाच चेहरा
म्हणून एक दिवस तरी द्या माहेरा ,
एक दिवस तरी द्या माहेरा .