marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शनिवार, ११ जुलै, २००९

पावसाळ्याच्या प्रारंभी

कुंद ही हवा
सुखावितो गारवा
वृध्दामनाअम्हां
छळितो दमा
नाहीतर बघा
तरुणपणी माझ्या
असतो मी कसा
शांत झोपलेला
ऊब दुलईची
हवीहवीशी कशी
मनात उरती
फक्त त्या स्मृती

मंगळवार, ७ जुलै, २००९

शाळेत म्हटलेली कविता

विद्यार्थी :- जा जा लाकूडतोड्या,करिसी तू काय कर्म बापा हे
का नच तोडीसी तू वाळवीने पोखरलेली अशी झाडे ?
वाळवी नष्ट कराया जाळायला हवे वाळवीचे लाकूड
मग रान साफ़ होई साफ ,जसे नाक होते साफ़,
फिरवुनी अंगुली काढताच सर्व मेकूड!
मास्तर:-रे थांब ज़रा,घालावया पाठीत तुझ्या आणतो लाकूड ।

हे बोल एकता मास्तरांचे,
उडी मारुनी केले मी घराकडे कूच

रविवार, ५ जुलै, २००९

लाजवंती

सांगू कशी,सांगू कशी ,
गोष्ट अशी मी सांगू कशी !ध्रु !
लाज वाटते जगावेगळ काही घडलय का ?
माझच काही बिघडलय का
सांगू कशी ---
नव्हते गेले करवंदाच्या जाळीमंदी
नव्हते रूपले अंगभर कुठे काटेकुटे
बगा पारकर तरी का फाटलाय कुठे
तरीपण इतुका रगताचा जणू डाग उठे ,
सांगू कशी ------
विपरीत काही घडलय ग
माझच काहीतरी चुकलय ग
तोंडावरती मुरुम पुटकुळ्या
आपसुक कशा काय फुटल्यात ग ?सांगू कशी--
चिंचा आवळे,कधी न पाडले
अंगणात जाऊंन दुसर्यांच्या,
वाडीत घुसून कोवळ्या काकड्या
कधीच नाही बाई काढल्या
पापे असली कधी न केली
एक मातृ मी गलती केली
मळावरती द्वाड चंदूने
शीळ घालूनी खुणावता मज
कया माझी थरथरली
ह्याच लहानग्या चुकीसाठी का
देवाजीने का हाणली काठी
ह्यालाच का जगी म्हणती
कालची बछडी मोठी झाली ?
सांगू कशी सांगू कशी ---