marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

रविवार, २० सप्टेंबर, २००९

तू ऐरावत मी रावत

हत्ती चालतो ,मदमस्त,झूलत संथपणे
पाठीवरती झूल मखमली ,त्यावरी मोत्याचे लेणे
माथ्यावरती बदाम आकाराची लाल भड़क ही उशी
दशादशातुनी तिच्या लोंबती,सोन्याच्या तारेतिल मोती
पेंड मोत्याचे लोम्बते,दोन्ही डोळ्याच्या मध्ये
सोंडेलाका ओझे होई ते सांडू न देण्याचे
पायामध्ये भली मोठी ही चांदीचीच कड़ी
बोटाबोटावरी बसवली कष्टाने ही जोड़वी
गर्वाने तो फुगून म्हणतो ,"लक्ष्मीने मज ठेविले"
प्रसन्न हसूनी बंधू त्याचा म्हणे"निसर्गे मज सेविले,
तू ऐरावत,मी रावत,तू ऐरावत मी रावत"