मजसवे पडेल कां
डोळ्यांतुनि डोळ्यांशि
संपर्क निदान होइल का 1
झाडित त्या हिरव्या
एकांति वार्ता होइल कां
प्रेमाचा संदेश माझ्या
ओठांबाहेर उमटेल कां 2
उमजोनि भावना माझि
प्रतिसाद तिं देशिल कां
चांदण्याच्या धुंद राति
घेउ कां आणाभाका 3
भविष्यांत कधितरि
आप्तांच्या साक्षिने
अंतरपाट दुर होता
मिलन अपुले होइल कां 4