बुधवार, ६ एप्रिल, २०११
ram-janma
चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी रामजन्म होई
इतिहासाची अविस्मरणीय घटना जणू पुनर्जीवित होई
दशरथ राजा अपत्यासाठी करी होम मोठा
अग्निदेवाही प्रसन्न होऊनी देई दिव्यं फळाला
हे फळ देई राजा तू आपुल्या आवडत्या पत्नीला
खाता होईल प्राप्ती एका सुंदर पुत्राची तिजला
राजाला परी प्रिय असती त्याच्या तीनही राण्या
निर्णय घेई फळ दिव्यं ते सम विभागून वाटण्या
भूमितीचे ज्ञान नसावे तेव्हां विकसित झालेले
तीनाऐवजी चार भाग मग दिव्याफलाचे केले
कोसल्या,कैकेयी ,पुढे होऊनी ग्रहण करती दोन भाग
राहिले दोन ते खाउनी ,सुमित्रेस दोन जुळ्यांचा लाभ
रामचंद्र युवराज येई पण पत्तारानीच्या पोटी
आनंदाने भरुनी अयोध्या आरास करी ती मोठी
पराक्रमी अन थोर असा तो युगपुरुष जाहला
म्हणून आजही रामनवमी ला रामजन्म सोहळा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)