marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शुक्रवार, २ जानेवारी, २००९

हुरहूर (दिसम्बर १,२००१)

चिंब भिजुनी प्रेमाने या उत्तररात्री
जपशील स्मृती प्रेमाची याची देशील काय खात्री
थेम्बा पाण्याचा जसा राहीना अळवाच्या पानावर
तसा तू प्रिया नाहीना प्रीतीस विसरणार
मी प्रेमिका तुझी ना आजपुरती
जीवनाचे प्रेमरूपी यज्ञ्नात दिली आहुती
मला ना अता वळुनपाह्याचे मागे
धुंदीत प्रीतीच्या तुझ्या सदा पुढेच जायचे
मनी परी कधी ही पाल शंकेची चूकचुके
की तुझी भूमिकाही अशीच असला ना गडे
मला फसवुनी तू कधी नाहीसा होशील का रे
मधु शोषुनी भ्रमर उडून जातो तसा रे
ते फूल अल्पसंतुष्ट (बीजांडावरी) रमते स्वकेसरी
प्रेमिका मातृ आठवे प्रियकरा जन्मजन्मांतरी

सोमवार, २९ डिसेंबर, २००८

डुंगरचे आदिवासी(पुढे चालू)

पानी आणायला लांब,डोंगर उतरून जाववायाचा नाय
पोटं रिकामी तोंड बी कोरडी ,असं फार दिवस चालायचं नाय
केलिच पायजेलकायतरी त्यांच्या पोटाची सय
पर एक दिवस मात्र ,शहरातला अण्णा आला
शेती नाय तारा नाय ,कायतरी उद्योग काढायला लागला
वेताच्या टोपल्याअन विणलेल्या चटाया
आठवड्याच्या बाजारात नेवून विकाया
तोडावी पानं अन कराव्या पत्रावली
करावे द्रोण सुबक आकार देवूनी
तेवढं विकून आजची गरज भागली
पन येनारया दिसावरही नजर रोकली
डोंगरच्या भवती चारा खणून काढले
पावसाचं पानी रोकण्यास नामी उपाय केले
आजवर आम्ही खूप कष्ट सोसलं
उद्याच सपान सुखाचा दिसाया लागला
म्हणा रे म्हणा सख्या हरी रंगा
आली रे आमच्या गावी विकासगंगा

डुंगरचे आदिवासी

आमची भूमाता आमच्यावर रागावली
आम्हीच पेरलेली बाजरी आम्हास ना गावली ।
दानं न्हई गावलं,झाडपाल्यावर रहाऊ,
देवाजीच्या किरपेची आम्ही वाट पाहू
आमचं एक राहील ,पण पोराबाळांच काय
त्यांचं वाढतं अंग, दान्याबिगर राह्यचं नाय.(अपूर्ण)

रविवार, २८ डिसेंबर, २००८

परले महोत्सवा(पुढे चालू )

तरदोन बक्षिसेही पटकावली
मी एवढे बोलतो तोच
अरे लाउडस्पीकर फार मोठ्याने वाजतोय
म्हणूनही पार्ले महोत्सव फार गाजतोय
माझी कविता एवढी काही चांगली नाही
म्हणूनच तीवाचायला मी लाजतोय

परले महोत्सवा

वर्ष संपता संपता पार्ले महोत्सव सुरु होतो

नवीन वर्ष संपेपर्यंत पुरेल एवढी

उत्साहाची बेगमी देवूनजातो

ह्या वेळेस मात्र कृष्णकुमार

नुसतीच मदत देव्वों नाही थांबले