गुरुवार, २८ मे, २००९
ज्येष्टांची कुरबुर
मज नको तुमचे तळलेले वडे बीडे
वा नको दारूचा थेंब कराया ओले माझे ओष्ट
मज पूर्वीपासून सारे जरी का फार आवडे
तरी आता झालो आहे मी एक जयेष्ट
सुंदर तरुणीचे नृत्य पहाया होई तेव्हा मी उत्सुक
आता पण मी नाक मुरडतो पाहून टी वी वरचे एकापेक्षा एक
गाण्यांमध्ये मला आवडे सर्वाधिक लावणी
अता परंतु भजनाविना ऐकत नाही गाणी
एक चांगले परंतु झाले इतक्या वर्षांनी
बळगोपाळांची कटकट आता पूर्वीसराखी मुळीच वाटत नाही

बुधवार, २७ मे, २००९
चंद्र आणि भूमी
पुनावेला कोजागिरी, चंद्राची पहावी निळाइ
संतानी जशी पाहिली ,सावळ्या विठ्ठलाच्या ठाइ
पूर्नाचाम्द्राचे चांदणे.मना करी शांत शांत,
जन शिवाची भजने, भाव भक्तिने गातात
अश्विनाच्या शुद्ध पक्षाच्या अंती येई कोजागिरी
कोणी म्हणे शरद पोर्णिमा ,शिवदूतांची येते फेरी
को जागर्ति,को जागर्ति ,त्यांची एकच आरोळी
भजनात जाई विरोनी,निजलेले नसावे कोणी
जाग असो दया बंधू ,देहाची तसे मनाची
भूमी व्यापन्या मग तुमची ,माय व्याली कोणाची.

सोमवार, २५ मे, २००९
कोणी कोणाचे नाही
आज पुन्हा वाटे मजला ,असे एकटा मी
आज परी घडले आहे,असे काय नामी
येशी तैसा जाशी एकटा ,म्हणती थोर सारे
मग कां जोडावी ही नाती, कारणाविना रे?
ह्रुदयातुनी पिळवटलेली, साद जों मिळाली
स्नेहबंधनांनी जेथे नसा नस जुळविली
तेथे नाते जे कां जुळते,नाव नाही त्याला
तेच खरे नाते असते, कधी न जाई लयाला
तेच खरे नाते असते,कधी न जाई लयाला
आज परी घडले आहे,असे काय नामी
येशी तैसा जाशी एकटा ,म्हणती थोर सारे
मग कां जोडावी ही नाती, कारणाविना रे?
ह्रुदयातुनी पिळवटलेली, साद जों मिळाली
स्नेहबंधनांनी जेथे नसा नस जुळविली
तेथे नाते जे कां जुळते,नाव नाही त्याला
तेच खरे नाते असते, कधी न जाई लयाला
तेच खरे नाते असते,कधी न जाई लयाला
रविवार, २४ मे, २००९
मझ्या आठवणीतला पहिला पाउस
माझ्या आठवणीतला पहिला पाउस किती जोरदार
हरवला नदीकाठ, पाण्याला कोण अडवणार?
शाळा माझी एका कांठीं,गाव दुसर्या कांठावर
अवघा एकच अरुंद पूल .शाला गावाला जोडणार
जातां पानी पुलावरुनी शाळेला होई सुट्टी
पानी लागता उंबर्याला,सोडल्या कागदाच्या बोटी
घरी बसल्या बसल्या आमची होइ करमणूक
स्म्रुती वासिष्ठीच्या बालमनीच्या ,अजूनी केली जपणूक
अतां वाटते, तेव्हांच अडवले असते पाणी
सह्याद्रिच्या पोटी खणून वळविले असते पाणी
तर देशावरी,झाला नसता दुष्काळ
आज आहे तसा,नसता दरोडेखोरांचा सुकाळ

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)