marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

मंगळवार, ५ मे, २००९

श्री गणेश वंदन भाग 2

सिंदूर नामक मत्ता राक्षस भूमीला भार जाहला
युक्तिशाक्ती दोन्ही तुजपाशी सिन्दुरासुर तू मारिला
लाल रक्त त्याचे उडोनी देह तुझा न्हाला रक्ती तो
म्हणूनी आम्ही विनायकाच्या दगडी मूर्तीला शेंदूर फासतो
अनेक सत्वे एकवटुनी पार्वतीमाता भरावी मोदक तुला
म्हणुनी आम्ही जीवनसत्वे सारी भरोनी दावू मोदक तुला
पूजेतुनी वा तुझ्या प्रसादे शक्तीयुक्ति आम्हा मिळो
उग्र रूप आमुचे बघुनी येथुनी दहशतवादी पळो

श्री गणेश वंदन

प्रथम वंदन तुला करती म्हणून नाव प्रथमेश
श्री शम्करान तुला नेमले नायक गणांचा इती श्रीगणेश
लोककथा ही तुला घडविले जगन्मातेने मळातुनि
म्हणुनी मूर्ती तुझी घडवितो आम्ही मातीतुनी
मूर्ती असो मातीची जरी ,पूज्य भावना सुवर्णाची
भक्ती असे सकलांची,ना मक्तेदारी कुणा सवर्णांची
पाच दिवस जरी तुला पूजितो कामे बाजू ठेवूनी
मनात करतो तुझी स्थापना,बारमास तुज आठवूनी
पुढे चालू