माझी अबोली धरून संमति
मला किनई ,जगी या,हवे तसे नाचविली,।।बाई मी अबोली
माझ्या मेलीच्या ओटीत टाकिती घोर पाप
भरपाई म्हणून देती नासक्या आंब्याचे ग काप ।धृ {[
मी आळविता देवाला ,म्हणे तो मजला
रिकामा काय गो तुझा वरचा मजला ।धृ।
देव म्हनेमाग माझ्या कानात
दिले नाही उगा तला मी दोन हात ।धृ।
आता मात्र मी जागी झाले आहे खडबडून
कोण वाटे जाता देईन दोन ठेवून ।धृ ।
राहिले न आता मुळीच मी अबला
शस्त्र घेउनी करी करीन गारद शत्रूला
मग टाप कुणाची बोलायाची ।बाई मी अबोली बाई मी अबोली