मंगळवार, १८ मे, २०१०
naamasmaraNaachee goDee
नामस्मरणाची गोडी
संतमहंता ना सोडी
नाही विसरण्याची खोडी
नामजप उपासनेला जोडी।
संत स्वरूपा ओळखती
त्यांना नाही कसली क्षिती
भोतिकाचे आकर्षण
नोहे त्या संतांसी
परी म्हणे रामदास
जरी का सिद्ध झालास
तरी उपासनेला
सोडो नये
सोडिता उपासना
होइ अहंकार
मग कैसे तूज
सिद्ध म्हणावे?
आम्ही पामरांनी
धरावे हे ध्यानी
भक्ती करताना
सिद्धता जरी आली
ब्रह्मस्वरूप होवोनीही
उपासनेला कधीही
थांबवू नये
भक्तीविना काही मागू नये
संतमहंता ना सोडी
नाही विसरण्याची खोडी
नामजप उपासनेला जोडी।
संत स्वरूपा ओळखती
त्यांना नाही कसली क्षिती
भोतिकाचे आकर्षण
नोहे त्या संतांसी
परी म्हणे रामदास
जरी का सिद्ध झालास
तरी उपासनेला
सोडो नये
सोडिता उपासना
होइ अहंकार
मग कैसे तूज
सिद्ध म्हणावे?
आम्ही पामरांनी
धरावे हे ध्यानी
भक्ती करताना
सिद्धता जरी आली
ब्रह्मस्वरूप होवोनीही
उपासनेला कधीही
थांबवू नये
भक्तीविना काही मागू नये
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)