marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

बुधवार, ३ जून, २००९

आरती 'सोबती'ची

संकटी , मम एकटेपणावर उपचार हाची 'सोबती'माझ्यापरी ,ज्येष्टजन हे मित्र होउनी ,सोबतीताच भेटती (ध्रु)
जयेष्ट नागरीक,आम्ही जरी ,सोबतीतिल जन सारे ,
आम्हांसाठी सुखावून जाती ,विचारांचे,नवयुगातील वारे।
विद्वान्,कसबी.प्रसिद्ध नेते,पाचारीत ही सोबती
संकटी ,मम एकटेपणावर ,उपचार हाची 'सोबती' !!
जुन्या म्हणींना रजा देऊनी, नवी घदविली अशी
जाशील बुधी, तर येशील 'कधी'नव्हे, तर येशील सोबतीमधी
सोबतीची सभा तर पार्ल्यामधी,बाहर आम्ही जाणार कधी
संकटी ,मम एकटेपणावर ---
बुधवारची आम्ही वाट पाहतो ,उत्कंठेने,बोधामृत चर्चेसाठी
नाट्य.संगीत,साहित्यातही तसेच रमतो ,दमतो खेळातही
सहलीताही सामील होती तेही ज्यांना चालायाला लागे काठी
संकटी मम एकटेपणावर--

सोमवार, १ जून, २००९

गारवा

गारवा जिवाला हवा
एकमेव सुखाचा ठेवा !!
शुद्ध निसर्गाचे दान
पूर्ण सुखाचे निदान
होरपळल्या देहासाठी
वाहत्या ओढ्याच्या काठी
जसा पाण्याचा शिडकावा
तसा ग्रीष्मानंतरचा गारवा
गारवा जिवाला हवा
एकमेव सुखाचा ठेवा