marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शनिवार, २ मे, २००९

मुंगी

एक होती मुंगी
तिने नेसली लुंगी
नार्वेकरांचा हां जर्म
ऐकून मला आली गुंगी
नार्वेकराम्ची प्रतिभा अशी
की तिच्यापुढे मोठे मोठे कवि
टाकतील नंगी
पण आमच्यासारखे लुंगेसुंगे
मात्र म्हणतील उठा
आता चला 'आदर' ला
कारण आपण सगळे चंगीभंगी

गुरुवार, ३० एप्रिल, २००९

में डे

महाराष्ट्र दिन हाच जगभरी
कामगार दिनही असे तरी
त्या श्रमिकांची ठेवा आठवण
करीत नसती जे कसली साठवण।
तो काम करोनी अर्धपोटी
भरतो धनिकांची ओटी
शिक्षित होवूनी कच्ची बच्ची
त्यांना मिळू दे जागा वरची
असे विनवी सदा प्रभूला
आज जरी त्या नसे खायला

मंगळवार, २८ एप्रिल, २००९

होली(भाग४)

अग्नि परी सांगे युक्ति
जा तुम्ही गोमातेप्रती
गोमय घेवूनी उन्हात सुकवुनी
शेनीवारी घ्या माझी शक्ति
शेणीवरी त्या अग्निशलाका
नेता प्रकटली प्रखर ज्वाला
ज्वालेतुनी त्या उभी जाहली
झळाळत लावण्यमयी देवी होळी
दुमदुमली मग तिन्ही लोकी
लावण्याची तिच्याच द्वाही
असुरासही मग मोह पड़े तो
विचारशक्ति नष्ट होवूनी
होलिकेस आलिंगन देई
भस्म होवून तिच्याच चरणी
राख राख गेला होवूनी
राखी पृथ्वीला होळी
म्हणुनी आजही करतो होळी
बिबल्यासही दूर राखते
अशी आपली पवित्र होळी।

टीप:-ही लांब लचक काल्पनिक कथा इथे संपली.बालांना पौराणीक कथांत रस वाटावा म्हणून हां प्रयत्न .परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने होळी करताना विचार करावा लागेल

होळी(सुधारित मुद्रण) भाग 3

ऐकुनी ते मनी हसून
"तथास्तु" ऐसे बोलून
ब्रह्मदेव मग तेथून
क्षणी होती अंतर्धान
असुर बहुत मातला
त्रिलोकी अजिंक्य जाहला
सुर मानव भयभीत
परमेशा शरणागत
"आता मात्र एक तुम्हा
अग्नीचा आधार हवा "
हां ऐकुनी उपदेश
इंद्रास येई आवेश
जाई तो अग्नीप्रती
मागान्यास त्याची शक्ती
(पुढील भाग नंतर वाचा)

सोमवार, २७ एप्रिल, २००९

होली(सुधारित मुद्रण) bhaag2

सर्व देव ब्रह्मासि
जावूनी ,मग आळविती
सोड़वी या त्रासातुनी
करिती त्यास विनती
ब्रह्मदेव प्रगटुनी
तापोभूमीवर येती
असुराला थोपवुनी
आशीर्वचना देती
"का कष्टसी सांग असा
काय हवे तुज वत्सा
सांग आता सत्वरी
प्रसन्न मी तुजवरी "
ऐकुनी ते बोल मधुर
उल्हसित मनी असुर
सांगे की ह्या भूवर
स्वर्गी वा पाताळी
शस्त्र न मम घात करी
ऐसा वर दे कृपा करी "
(पुढे नंतर वाचा)

रविवार, २६ एप्रिल, २००९

होली (सुधारित मुद्रण)

असुरासही ज्ञ्न्यात होई
भक्तितुनी शक्ति मिले
तापातुने सामर्थ्य मिले
तिन्ही लोल जिंकण्यास
एकाच हां मार्ग असे।
ढोंग करुनी भक्तीचे
तो तप करण्यास बसे
नामस्मरण ब्रह्माचे
उच्चारत सतत बसे
गेली वर्शामागुनी वर्षे
तपोबल अधिकाधिक ते
होवूनी जड़ पृथ्वीला
आकाशा जालीत असे (पुढील भाग नंतर पहा)

भाग २

स्वर्गी वा पाताळी अग्नी परी सांगे युक्ती म्हणुनी आजही करतो होळी
शस्त्र न मम घात करी जा तुम्ही गोमातेप्रती बिबळ्यासही दूर राखते
ऐसा वर दे क्रुपा करी गोमय उन्हात सुकवनी संजय गांधी उद्यानातुनी
ऐकुनी ते,मनी हासुनी शेणीवरी घ्या मम शक्ती अशी आपुली पवित्र होळी
"तथास्तु"ऐसे बोलुनी शेणीवरी त्याअग्निशलाका
ब्रह्मदेव मग तेथुन नेता,प्रकटली प्रखर ज्वाला
क्षणी होती अंर्तधान ज्वालेतुनी त्या उभी जाहली
असुर बहु मातला झळाळत लावण्यमय देवे होळी
त्रिलोकी अजिंक्य जाहला दुमदुमली लोकी तिन्ही
सुर मानव भयभीत लावण्याची तिच्याच द्वाही
परमेशा शरणागत असुरासही मोह पडे
आता मात्र एक तुम्हा लावण्याचा,धावत येइ
अग्निचा आधार हवा विचारशक्ती नष्ट होवूनी
हा ऐकुनी उपदेश होलिकेस आलिंगन देइ
इंद्रास येइ आवेश नष्ट होवूनीतिच्याच चरणी
जाइ तो अग्नीप्रती राख राख होवूनी गेली
मगण्यास त्याची शक्ती रखी प्रुथ्वीला होळी

होळीची प्रथा (एक काल्पनिक

असुरासही न्यात होइ सर्व देव ब्रह्मासि
भक्तितुनी शक्ती मिळे जाउनी मग आळविति
तपातुनी सामर्थ्य मिळे सोडव ह्या त्रासातुनी
तिन्ही लोक जिंकण्यास करिति त्याला विनती।
एकच हा मार्ग असे ब्रह्मदेव प्रगटुनी
एकच हा मार्ग असे तपोभूमीवर येती
ढोन्ग करुन भक्तिचे असुराला थोपवुनी
तो तप करण्या बसे आशीर्वचनाला देति
नामस्मरण ब्रह्माचे "का कष्टसी सांग असा,
उच्चारत सतत बसे काय हवे तुज वत्सा
गेली वर्षामागुनी वर्षे माग आता सत्वरी
तपोबल अधिकाधिक ते प्रसन्न मी तुजवरी"
होवूनी जड प्रुथ्वीला ऐकुनी ते बोल मधुर
आकाशा जाळीतसे उल्हसित मनी असुर
सांगे की ह्या भूवर (भाग २ पहा)