marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

मंगळवार, २८ एप्रिल, २००९

होली(भाग४)

अग्नि परी सांगे युक्ति
जा तुम्ही गोमातेप्रती
गोमय घेवूनी उन्हात सुकवुनी
शेनीवारी घ्या माझी शक्ति
शेणीवरी त्या अग्निशलाका
नेता प्रकटली प्रखर ज्वाला
ज्वालेतुनी त्या उभी जाहली
झळाळत लावण्यमयी देवी होळी
दुमदुमली मग तिन्ही लोकी
लावण्याची तिच्याच द्वाही
असुरासही मग मोह पड़े तो
विचारशक्ति नष्ट होवूनी
होलिकेस आलिंगन देई
भस्म होवून तिच्याच चरणी
राख राख गेला होवूनी
राखी पृथ्वीला होळी
म्हणुनी आजही करतो होळी
बिबल्यासही दूर राखते
अशी आपली पवित्र होळी।

टीप:-ही लांब लचक काल्पनिक कथा इथे संपली.बालांना पौराणीक कथांत रस वाटावा म्हणून हां प्रयत्न .परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने होळी करताना विचार करावा लागेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: