marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शुक्रवार, १० एप्रिल, २००९

विनायक दामोदर सावरकर

शिक्षण घेण्या अनेक हिंदी विलायतेस गेले
बरेचजण त्यांपैकी परी ,मातृप्रेमास मुकले
एक असा विनायक त्यांपैकी जे देशप्रेमी ठरले,
राष्ट्राला समर्थ करण्यासाठी कटिबद्ध जाहले ।
क्रांतिज्योत पेटविण्या पुस्तकातुनी पिस्तूल पाठविले
धूर्त अशा आंग्लांच्या नजरेतुनी नच सुटले
शिक्षा काळ्या पाण्याची झाली,कष्ट किती भोगले
शरीर जर्जर झाले परे मन दुबळे नच झाले
युद्ध सुरु होता तरुणांस भरती होण्या सुचविले
भारत उद्याचा समर्थ व्हावा ,ह्या एकाच उद्देशाने
शिक्षा संपुनी घरी परतता स्वस्थ नाही बसविले
पतित पावन मंदिर बांधले ,जातिभेद मिटविले
राजकारण असे घडले ,क्षण एक लोक त्यांना विसरले
राष्ट्रप्रेम तरीही त्यांचे मुळी न ओसरले
आज तयांच्या पुण्यातिथीला पुन्हा स्मरु त्यांना
दिव्य भव्य त्या राष्ट्रभक्तीला देवू मानवंदना