आनंदाने मी वाहतो तव चरणावर कुडी
अवतन मजला लवकर धाड़ी,जोवर भजनाताच गोंडी
तालात भजनाच्या रंगू दे,मम ट़ा लांची जोड़ी
नमस्कार तुजलाच करू दे मम हातांची जोड़ी
मुखात माझ्या सदा असावे केवल रामनाम
चित्ती बसावे गोड़ रूप ते प्रभूचेच ठाम
गंध फुलांचा घेण्याआधी तव चरनी ती वाहीन
मंद श्वास मम होण्याआधी तुझेच गीत गाइन.
`
l