marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

सोमवार, २५ मे, २००९

कोणी कोणाचे नाही

आज पुन्हा वाटे मजला ,असे एकटा मी
आज परी घडले आहे,असे काय नामी
येशी तैसा जाशी एकटा ,म्हणती थोर सारे
मग कां जोडावी ही नाती, कारणाविना रे?

ह्रुदयातुनी पिळवटलेली, साद जों मिळाली
स्नेहबंधनांनी जेथे नसा नस जुळविली
तेथे नाते जे कां जुळते,नाव नाही त्याला
तेच खरे नाते असते, कधी न जाई लयाला

तेच खरे नाते असते,कधी न जाई लयाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: