marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शुक्रवार, २ जानेवारी, २००९

हुरहूर (दिसम्बर १,२००१)

चिंब भिजुनी प्रेमाने या उत्तररात्री
जपशील स्मृती प्रेमाची याची देशील काय खात्री
थेम्बा पाण्याचा जसा राहीना अळवाच्या पानावर
तसा तू प्रिया नाहीना प्रीतीस विसरणार
मी प्रेमिका तुझी ना आजपुरती
जीवनाचे प्रेमरूपी यज्ञ्नात दिली आहुती
मला ना अता वळुनपाह्याचे मागे
धुंदीत प्रीतीच्या तुझ्या सदा पुढेच जायचे
मनी परी कधी ही पाल शंकेची चूकचुके
की तुझी भूमिकाही अशीच असला ना गडे
मला फसवुनी तू कधी नाहीसा होशील का रे
मधु शोषुनी भ्रमर उडून जातो तसा रे
ते फूल अल्पसंतुष्ट (बीजांडावरी) रमते स्वकेसरी
प्रेमिका मातृ आठवे प्रियकरा जन्मजन्मांतरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: