marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

सोमवार, २९ डिसेंबर, २००८

डुंगरचे आदिवासी(पुढे चालू)

पानी आणायला लांब,डोंगर उतरून जाववायाचा नाय
पोटं रिकामी तोंड बी कोरडी ,असं फार दिवस चालायचं नाय
केलिच पायजेलकायतरी त्यांच्या पोटाची सय
पर एक दिवस मात्र ,शहरातला अण्णा आला
शेती नाय तारा नाय ,कायतरी उद्योग काढायला लागला
वेताच्या टोपल्याअन विणलेल्या चटाया
आठवड्याच्या बाजारात नेवून विकाया
तोडावी पानं अन कराव्या पत्रावली
करावे द्रोण सुबक आकार देवूनी
तेवढं विकून आजची गरज भागली
पन येनारया दिसावरही नजर रोकली
डोंगरच्या भवती चारा खणून काढले
पावसाचं पानी रोकण्यास नामी उपाय केले
आजवर आम्ही खूप कष्ट सोसलं
उद्याच सपान सुखाचा दिसाया लागला
म्हणा रे म्हणा सख्या हरी रंगा
आली रे आमच्या गावी विकासगंगा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: