marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

गोड स्वप्न

गांठ तुझ्या प्रेमाचि
मजसवे पडेल कां
डोळ्यांतुनि डोळ्यांशि
संपर्क निदान होइल का  1

झाडित त्या हिरव्या
एकांति वार्ता होइल कां
प्रेमाचा संदेश माझ्या
ओठांबाहेर उमटेल कां  2

उमजोनि भावना माझि  
प्रतिसाद तिं देशिल कां
चांदण्याच्या धुंद राति
घेउ कां आणाभाका    3

भविष्यांत कधितरि  
आप्तांच्या साक्षिने
अंतरपाट दुर होता
मिलन अपुले होइल कां  4

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: