marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शनिवार, २३ मे, २००९

नवकविची व्यथा

अशी कशी छंदोमयी
करणार मी कविता
धडपड चालू राही
जोवरी चंद्रसविता

अक्षरे मोजकी हवी
एक ना जास्त वा कमी
शब्द उलटेपालटे
कसेही करणे चाले

असे शब्द निवडावे
सीमित अक्षरा भावे
अर्थास त्यातुनी घ्यावे
कसेतरी समजोनी

भाव मुके ती कविता
नैसर्गिकता नुरता
लागते असे बोलाया
कविंनो तुम्ही का विता?

२ टिप्पण्या:

कृष्यणकुमार प्रधान म्हणाले...

ज्येष्ट नागरिकांच्या सोबति-विलेपार्ले ह्या संस्थेने
पूर्वी काव्य-स्प्र्धा घेतली होती.त्यात उतारवयात नव्यानेच कविता करणारे बरेच होते.ट्या कविता पाहून प्रो सुधिर देशपांडे नावाचे परिक्षक म्हणाले की कविता निदान मोजक्या अक्षरांच्या ओळीत असाव्या.
त्यांनंतर सुचलेली ही कविता