marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

सोमवार, २२ जून, २००९

किशोरीम्चे गाणे (चाल चला चला ग सयांनो )

या ग या,या ग या,या ग या,
सख्यांनो,माझ्या ग ,संगती खेळाया[ध्रु ]
ष्रावणसरींच्या शिडकाव्याखाली
केसांची बट ही झुकली कपाळी
घरात म्हणू दे आईला भूपाळी
आपण मोकाट हिन्डू रानोमाळी[१]

झाडांना बान्धूया दोरांचे झोपाळे
मुलिम्नो घेऊ या आपण हिंदोळे
डोंगर हिरव्या शाली लपेटती
दुधाळ फेसाळ धारा झेपावाती[2]

खड़क ओले हे हळूच ओलांडी
बेडूक पाहून जाईल झोकांडी
त्यांना गिळण्याला येइल नागीण
भिऊ नको आला पंचमीचा सण[३]

या ग या,या ग या,या ग या,या ग या
सख्यांनो ,माझ्या ग, संगती खेळाया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: