marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

जय अंबामाता

प्राणाहूनही प्रिय आम्हा वंद्य विंध्यावासिनी
सर्व काळी,ठायी ठायी रक्षिते ती कुलस्वामिनी .
बालकृष्णा वांचाविणया जन्म घेई श्री देवी ती गोकुळि
कृष्णास सोडुनी गोकुळी ,तिज आणि  वासुदेव कारागृही
कंस येई मारण्याला आपुल्या नवजात शत्रूला
हातातुनी निसटली थोर ती दिव्याबाला .
मथुरेतुनी ती जाता नभी ,होत असे आकाशवाणी
"कंसराजा ,मुर्ख मनुजा .मारण्या तुला,येत असे हरी गोकुळातुनी
नभातुनी ती देवता मग विंध्यागीरीवर उतरली
चंब ळातीरीच्या जनांनि नतमस्त क होऊनी पूजिली
आज म्हणुनी,स्थळी जळी अगर पाषाणी
कोठे असू तरी आठवितो तिजला मनी
संकटी आम्हांस तारी ,युद्धात बळ देई माउली
अर्पिती सवँस्व तिजला ,भक्तांस त्या ती पावली.

1 टिप्पणी:

कृष्यणकुमार प्रधान म्हणाले...

ह्यात वसुदेव ह्या शब्दाबद्दल चुकून वासुदेव असा शब्द पडला आहे.गोकुळात कृष्णाला ठेवून वसुदेव मुलीस घेवून जातो .वासुदेव असे कृष्णाचे नाव आहे