शुक्रवार, २३ जानेवारी, २००९
भूपाली
पहाम्टे पहाम्टे मला जाग आली
पहाता पहाता भू दंवात न्हाली
आई नहात असता सुते दारी बसावे
बाहेरुनी येत असता पित्यासही थोपवावे
इथे कोणते दार वा पिता कोण ते कळेना
मनी दाट अंधार ,जगाचे कूट उकलेना
स्नान उरकुनीशाली चन्द्रमा ल्याली
सर्वांगी सुंदर चांदण्यांचे नक्षीकाम भारी
परी चांदण्या एकेककुठे लुप्त होती
जसे आसमंत उजळुनी,स्वागता सिद्ध हो ती
रवि प्रवेशिता लाल जणू तापलेला
महाभारती कर्णवध नच भावलेला
सांगणार त्यास कोण नियमांचा पालनकर्ता
दंडनीय मंत्रीसुतही कुमार्गी ,ही तर आचारसंहिता
पहाता पहाता भू दंवात न्हाली
आई नहात असता सुते दारी बसावे
बाहेरुनी येत असता पित्यासही थोपवावे
इथे कोणते दार वा पिता कोण ते कळेना
मनी दाट अंधार ,जगाचे कूट उकलेना
स्नान उरकुनीशाली चन्द्रमा ल्याली
सर्वांगी सुंदर चांदण्यांचे नक्षीकाम भारी
परी चांदण्या एकेककुठे लुप्त होती
जसे आसमंत उजळुनी,स्वागता सिद्ध हो ती
रवि प्रवेशिता लाल जणू तापलेला
महाभारती कर्णवध नच भावलेला
सांगणार त्यास कोण नियमांचा पालनकर्ता
दंडनीय मंत्रीसुतही कुमार्गी ,ही तर आचारसंहिता
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा