marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

रविवार, २५ जानेवारी, २००९

अपुला भारत एक

बंध गुलामीचे तुटले ,तरी राहिला एकच धागा
राष्ट्रकुलातून अंग काढता ,परंतु तुटला तोही धागा
अठवण परकी साम्राज्याची , पुसून गेली पूर्णपणे ,
भारत स्वतंत्र प्रजासत्ताक होता वाटे आम्हा काय उणे
एकसंघ जरी भारत होता ,जुळली होती काय मने?
शंका अजुनी मनात येते ,गाजर पुढती कसले होते ?
स्वतंत्र होता ,करू या आपण ,रचना भाषावार ही
भुलाविन्यास कुणी होते ,विसरलो आपण ते नाही
पोटीरामुल्लूचा जीवच गेला उपोषणाला बसाला असता
तेलंगणाला हो म्हणण्याविन उपाय मग राही कोणता
सुरु जाहले तुकडे पडणे,जो उठला तो मातृभाशेचा दावी बडगा
मुंबई प्रांतातून मराठी वेगले करण्यासाठी झाला ग़लगा।
चळ्वळ दडपून टाकण्या,झडल्या फैरी, हुतात्मे झाले एकशे सात
जखमींची तर गणना नाही, भारत रडला दुनिया दाखवी दात्
आज पुन्हा ध्वजा तिरंगी ,करुन वंदना नम्रपणे
निश्चय करू या राष्ट्रभक्ती चा एकवतता आम्हा काय उणे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: