marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

गुरुवार, ६ मे, २०१०

निद्रानाश

निद्रासमय नावाच्या विशाल समुद्रात
उभ रहातं एक बेट
किती प्रयत्न केला तरी
हे बेट बेटं बुडतच नाही
बेटाच्या भंवती असते
समुद्राच्या पाण्याची खळखळ
ह्या बेटाच्या भंवती असते
निरनिराळ्या विचारांची सळसळ
विचार तर झोपेतही असतातच
पण तेव्हां ते स्वप्नांच रूप घेतात
स्वप्ना आहेत तोवर झोप लागले
ह्याची आपल्याला खात्री असते
तो एक दिलासा असतो
पण ह्या बेटावर मात्र
स्वप्नही नाहीत अन झोपही नाही
मध्येच ऐकू येणारे कुत्र्यांचे भुकणे
अथवा बाजूच्या खोलीतून येणारे
एखाद्या लहानुल्याचे रडणे
ऐकू आले तर वाटते
हेच नाही ना झोप मोडण्याचे कारण?
पण खरे कारण वेगळेच असते
आपल्याच दोन मनातील अंतर्गत
भांडण हेच ते कारण असते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: