शनिवार, २४ एप्रिल, २०१०
कृष्णविवर
अखंड तेवत एकच ज्योती
अंधाराला शोधत होती
जिथे जिथे ती जाइ तेथे
अंधार कसा तो जै निघूनी
अखेर एका खराब दिवशी
जेव्हां संपली तेलाची बुधली
तेव्हां त्या ज्योतीला कळाले की
लपला होता तो तिच्याच वातीखाली
क्षणांत येवूनी पसरे भोवती
गिळून टाकी अवघी धरती
ठिणगीच्या रुपे त्यला बघोनी
ज्योती परंतु त्याला म्हणली
असशील जरी तू काळा तारा
विश्वामध्ये अनंत ज्योती भरल्या
एकामागुनी एक उगवती
तुलाच किंवा होता उपरती
होशील तुची तेजावर स्वार
विश्वाचा ह्या तारणहार
अंधाराला शोधत होती
जिथे जिथे ती जाइ तेथे
अंधार कसा तो जै निघूनी
अखेर एका खराब दिवशी
जेव्हां संपली तेलाची बुधली
तेव्हां त्या ज्योतीला कळाले की
लपला होता तो तिच्याच वातीखाली
क्षणांत येवूनी पसरे भोवती
गिळून टाकी अवघी धरती
ठिणगीच्या रुपे त्यला बघोनी
ज्योती परंतु त्याला म्हणली
असशील जरी तू काळा तारा
विश्वामध्ये अनंत ज्योती भरल्या
एकामागुनी एक उगवती
तुलाच किंवा होता उपरती
होशील तुची तेजावर स्वार
विश्वाचा ह्या तारणहार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा