सोमवार, २१ डिसेंबर, २००९
चुकलेली वाट
चांद्रयान एकदा वाट की हो चुकले
तिथी पाहिल्याविना सुटले ,चंद्रकक्षा ओलांडुनी गेले
दिवस रात्र हे भेद नाही उरले
पाहती रडारचे डोळे तो अद्भुत द्रष्य दिसले
काळ्या मखमली चादरीवरी असंख्य तारे चमचमले
नव्हती घेतली सी डी अर्व ग्रहांच्या वेळापत्रकांची
जेथे जावे तेथे ग्रहांची चुकामूक व्हावयाची
असे होता यानास त्या शनी दिसला
उपग्रहांच्या घोळक्याने पूर्ण वेढलेला
आता पाहू प्रत्यक्ष तेज त्या शनीचे
नमुनी त्याला वर्णू या प्रेम धरतीचे
परी भोवती फिरणारे उपग्रह अडवती याना
म्हणती अशनि हा कोण इथे घुसला
जा सांग जावूनी जिथुनी आला त्या अवनीला
शनी तुजशी धरत आहे पूर्ण अबोला
पुत्र तिचे स्तवतात सदा चंद्राला
आहे का एक माइचा लाल नावाजत शनीला
एक तो कृष्ण ज्यने अढळ म्हणुनी धृवावर काव्य केले
मंगेश दुसरा ज्याने शुक्रतारा गीत ऐकविले
ऐकण्याला पुढे काही ते यान थांबले ना
अर्धवृत करुनी अवनीवरी परतले बा.
तिथी पाहिल्याविना सुटले ,चंद्रकक्षा ओलांडुनी गेले
दिवस रात्र हे भेद नाही उरले
पाहती रडारचे डोळे तो अद्भुत द्रष्य दिसले
काळ्या मखमली चादरीवरी असंख्य तारे चमचमले
नव्हती घेतली सी डी अर्व ग्रहांच्या वेळापत्रकांची
जेथे जावे तेथे ग्रहांची चुकामूक व्हावयाची
असे होता यानास त्या शनी दिसला
उपग्रहांच्या घोळक्याने पूर्ण वेढलेला
आता पाहू प्रत्यक्ष तेज त्या शनीचे
नमुनी त्याला वर्णू या प्रेम धरतीचे
परी भोवती फिरणारे उपग्रह अडवती याना
म्हणती अशनि हा कोण इथे घुसला
जा सांग जावूनी जिथुनी आला त्या अवनीला
शनी तुजशी धरत आहे पूर्ण अबोला
पुत्र तिचे स्तवतात सदा चंद्राला
आहे का एक माइचा लाल नावाजत शनीला
एक तो कृष्ण ज्यने अढळ म्हणुनी धृवावर काव्य केले
मंगेश दुसरा ज्याने शुक्रतारा गीत ऐकविले
ऐकण्याला पुढे काही ते यान थांबले ना
अर्धवृत करुनी अवनीवरी परतले बा.
सोमवार, १४ डिसेंबर, २००९
prasavavedanaa
प्रसववेदना
शंत नीरव पहांटेची वेळ असावी
लेखणी घेऊनी हाती सिद्ध होइ कवी
अशा समयी हाय परंतु जागते मुंब ई
हाती घेवोनी बाटली चालते आकृती मानवी
उद्यान असो,मैदान असो,प्रातर्विधीला जागा हवी
निषेधाचे सूर उठती भटक्या श्वानांच्या करवी
रक्षक कायद्याचे जणू त्यांच्याविना दुजे न कोणी
असतील जरी,निद्रिस्त तरी,पगार घेती जरी.
कविता प्रसविता प्रसविता अबॉर्शन की जाहले
कशी होइल लयबद्ध, नको ते शब्द मध्ये अडमडले
शंत नीरव पहांटेची वेळ असावी
लेखणी घेऊनी हाती सिद्ध होइ कवी
अशा समयी हाय परंतु जागते मुंब ई
हाती घेवोनी बाटली चालते आकृती मानवी
उद्यान असो,मैदान असो,प्रातर्विधीला जागा हवी
निषेधाचे सूर उठती भटक्या श्वानांच्या करवी
रक्षक कायद्याचे जणू त्यांच्याविना दुजे न कोणी
असतील जरी,निद्रिस्त तरी,पगार घेती जरी.
कविता प्रसविता प्रसविता अबॉर्शन की जाहले
कशी होइल लयबद्ध, नको ते शब्द मध्ये अडमडले
सोमवार, ७ डिसेंबर, २००९
त्सुनामी
डळमळले भूमंडळ डचमळले सिंधूजल
चतुष्पाद तृणचर ते झाले विस्चलित
द्विपाद विचारवन्त,करती घराची खंत
जलाशयाची लाट अकस्मिक येता प्रलयंकर
कोसळता घरं,त्याखाली तडफडते मानव
प्राण्यांच्या मात्र कुणी येउनी सांगितले कानी
जीव वाचवा डोंगरी जाउनी कोपली आहे धरणी
कुणास ठाऊक काय कैसे झाले ते
पहिली भेग का पडली तुला गे धरणीमाते?
सागरतळातचभेग होवूनी पाणी गेले खाली
लाव्हाच्या त्या तप्त रसाने झली लाही लाही
गेले त्याच्या शतपट वेगे उसळुनी आले जलही
म्हणता म्हणता आक्रमली पाण्याने अवघी धरणी.
झाले गेले हौनी गेले,करा आता मलमपट्टी
अनाथ,दु:खी, ह्यांनी भरली अवघी किनारपट्टी
तरीही जीवन चालत आले,तसेच अखंडित
धावून आले जग सारे घेउनी मदतीचा हात
फिनिक्स पक्ष्यापरी राखेतूनही उठेल मानवजात.
चतुष्पाद तृणचर ते झाले विस्चलित
द्विपाद विचारवन्त,करती घराची खंत
जलाशयाची लाट अकस्मिक येता प्रलयंकर
कोसळता घरं,त्याखाली तडफडते मानव
प्राण्यांच्या मात्र कुणी येउनी सांगितले कानी
जीव वाचवा डोंगरी जाउनी कोपली आहे धरणी
कुणास ठाऊक काय कैसे झाले ते
पहिली भेग का पडली तुला गे धरणीमाते?
सागरतळातचभेग होवूनी पाणी गेले खाली
लाव्हाच्या त्या तप्त रसाने झली लाही लाही
गेले त्याच्या शतपट वेगे उसळुनी आले जलही
म्हणता म्हणता आक्रमली पाण्याने अवघी धरणी.
झाले गेले हौनी गेले,करा आता मलमपट्टी
अनाथ,दु:खी, ह्यांनी भरली अवघी किनारपट्टी
तरीही जीवन चालत आले,तसेच अखंडित
धावून आले जग सारे घेउनी मदतीचा हात
फिनिक्स पक्ष्यापरी राखेतूनही उठेल मानवजात.
मंगळवार, १ डिसेंबर, २००९
द्वंद्व
हा जीव जोवरी जगतोहे
तोवरी मन शरीरी गुंतुनी राहे
आजवरी केली बंडखोरी अशी
मांडिला उभा दवा शरीराशी
शरीर पण हे इतुके हट्टी
मनशी धरली तयाने कट्टी
कधी घ्यावी मनाने उभारी
तर शरीर जणू त्याचे वैरी
कधी शरीरावरी येइ शहारा
कधी’तेरे यादने मारा’
मन घाली देहा लगाम"
हे पाप,इथे तुझे काय काम?"
असे दोघांचे चाले रणकंदन
परी होणार नाही विभाजन
तोवरी मन शरीरी गुंतुनी राहे
आजवरी केली बंडखोरी अशी
मांडिला उभा दवा शरीराशी
शरीर पण हे इतुके हट्टी
मनशी धरली तयाने कट्टी
कधी घ्यावी मनाने उभारी
तर शरीर जणू त्याचे वैरी
कधी शरीरावरी येइ शहारा
कधी’तेरे यादने मारा’
मन घाली देहा लगाम"
हे पाप,इथे तुझे काय काम?"
असे दोघांचे चाले रणकंदन
परी होणार नाही विभाजन
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९
ससा आणी फक्त ससाच
एक होता ससा
सांगा पाहू कसा?
पांढरा पांढरा रंग
अन मवू मवू अंग
मोठे मोठे कान
लाल लाल डोळे छान
काय बरे खातो?
लठ्ठ मात्र दिसतो
असा हा ससा
धीट नाही तसा
चाहूल लागता पळतो
झाडाझुडपात लपतो
तुरुतुरु ह्याची चाल
पहाल तर थक्क व्हाल
असा हा ससा
ह्याला खूप खूप हसा
सांगा पाहू कसा?
पांढरा पांढरा रंग
अन मवू मवू अंग
मोठे मोठे कान
लाल लाल डोळे छान
काय बरे खातो?
लठ्ठ मात्र दिसतो
असा हा ससा
धीट नाही तसा
चाहूल लागता पळतो
झाडाझुडपात लपतो
तुरुतुरु ह्याची चाल
पहाल तर थक्क व्हाल
असा हा ससा
ह्याला खूप खूप हसा
रविवार, १ नोव्हेंबर, २००९
उत्तराचा डेटा
उत्तराचा डेटा तुम्ही मला आणा बाबा
प्रश्नांचे उन बाई,
डोके तापवून जाई
करा तुम्ही माझ्यावरी सोल्युशनची वर्षा
नाही जाग नाही श्रम
परी होई टेंशन
सेलशिवाय चालेल का मोबाइल माझा
कंपासपेटीत गुपचुप
मोबाइल झाला बंद
चिप त्यात मी सारावी ,अशी करा माया
प्रश्नांचे उन बाई,
डोके तापवून जाई
करा तुम्ही माझ्यावरी सोल्युशनची वर्षा
नाही जाग नाही श्रम
परी होई टेंशन
सेलशिवाय चालेल का मोबाइल माझा
कंपासपेटीत गुपचुप
मोबाइल झाला बंद
चिप त्यात मी सारावी ,अशी करा माया
शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २००९
नविन काही सुचावे
आज मला वाटे,माझ्या नशिबी केवळ काटे
एक सोबत होती प्रतिभेची पहाटे पहाटे
तीही सोडून जाता वाटे मला एकटे एकटे
प्राणी आणी वृक्षवल्ली ह्यांतही माझे कोणी नसते ।
लिहू काय अन कसा चाले ना लेखणी
लिहिले तरी वाचक मिळे ना कोणी
प्रकाशक आणी मुद्रक वगैरे तर राहिले दूर
तूच आता परमेश्वरा नेइनास का दूर
एक सोबत होती प्रतिभेची पहाटे पहाटे
तीही सोडून जाता वाटे मला एकटे एकटे
प्राणी आणी वृक्षवल्ली ह्यांतही माझे कोणी नसते ।
लिहू काय अन कसा चाले ना लेखणी
लिहिले तरी वाचक मिळे ना कोणी
प्रकाशक आणी मुद्रक वगैरे तर राहिले दूर
तूच आता परमेश्वरा नेइनास का दूर
बुधवार, ३० सप्टेंबर, २००९
सुवर्णजयंती सोसायातीची
ह्या नवनवीन मनमीलनोत्सवा
भाषेत असावा थोडा गोडवा
ओसरेल मग परस्परातील दुरावा
गृहसंस्था केवल नव्हे, मैत्रीकट्टाच व्हावा
भाषेत असावा थोडा गोडवा
ओसरेल मग परस्परातील दुरावा
गृहसंस्था केवल नव्हे, मैत्रीकट्टाच व्हावा
रविवार, २० सप्टेंबर, २००९
तू ऐरावत मी रावत
हत्ती चालतो ,मदमस्त,झूलत संथपणे
पाठीवरती झूल मखमली ,त्यावरी मोत्याचे लेणे
माथ्यावरती बदाम आकाराची लाल भड़क ही उशी
दशादशातुनी तिच्या लोंबती,सोन्याच्या तारेतिल मोती
पेंड मोत्याचे लोम्बते,दोन्ही डोळ्याच्या मध्ये
सोंडेलाका ओझे होई ते सांडू न देण्याचे
पायामध्ये भली मोठी ही चांदीचीच कड़ी
बोटाबोटावरी बसवली कष्टाने ही जोड़वी
गर्वाने तो फुगून म्हणतो ,"लक्ष्मीने मज ठेविले"
प्रसन्न हसूनी बंधू त्याचा म्हणे"निसर्गे मज सेविले,
तू ऐरावत,मी रावत,तू ऐरावत मी रावत"
पाठीवरती झूल मखमली ,त्यावरी मोत्याचे लेणे
माथ्यावरती बदाम आकाराची लाल भड़क ही उशी
दशादशातुनी तिच्या लोंबती,सोन्याच्या तारेतिल मोती
पेंड मोत्याचे लोम्बते,दोन्ही डोळ्याच्या मध्ये
सोंडेलाका ओझे होई ते सांडू न देण्याचे
पायामध्ये भली मोठी ही चांदीचीच कड़ी
बोटाबोटावरी बसवली कष्टाने ही जोड़वी
गर्वाने तो फुगून म्हणतो ,"लक्ष्मीने मज ठेविले"
प्रसन्न हसूनी बंधू त्याचा म्हणे"निसर्गे मज सेविले,
तू ऐरावत,मी रावत,तू ऐरावत मी रावत"
मंगळवार, १५ सप्टेंबर, २००९
चंद्रयान
ढगांनी झाकले आकाश
गवसेल का अवकाश?
बालपणीचे स्वप्न माझे
चंद्रावर जाउन येण्याचे
प्रत्यक्षात येइल का?
डोळे लावून वटवाघळाचे
यानाला त्या दिसेल का?
बालपणीचे स्वप्न माझे,
प्रत्यक्षात येइल का?
गवसेल का अवकाश?
बालपणीचे स्वप्न माझे
चंद्रावर जाउन येण्याचे
प्रत्यक्षात येइल का?
डोळे लावून वटवाघळाचे
यानाला त्या दिसेल का?
बालपणीचे स्वप्न माझे,
प्रत्यक्षात येइल का?
शनिवार, १२ सप्टेंबर, २००९
बुधवार, ९ सप्टेंबर, २००९
अता तरी जागी हो
(महिला दिनाच्या निमित्ताने}
दिवस सुगीचे ,पीक झोदण्याचे
जो तो उद्याचे स्वप्न पहातो
उभारलेली सोन्याची कनसे
पाहुनी मनी लाई उभारतो
शेतांच्या मधुनी जाई पायवाट
त्यावारुनी चाले पहा कशी नीट
खेद्यातली नारी,कणसावनी तट्ट
लागे कोणाच्या नजरेची द्रष्ट
बाजूस कोणीनही पाहात
रगेल गड्याचा पडलाच हात
क्षणात झाले होत्याचे नव्हते
निष्पाप नारीचे सर्वस्व हरपले
युगायुगंची ही रडकथा
इतक्या वर्षांनी थांबली आता
जनांची निंदा सहन करीन
बालाला तशीच जन्म देइन
उभा करीन पुरावा ,डीएनए परीक्षा देउन
अपराध्याला शिक्षा करू दे शासन
तेव्हांच होइल माझे सांत्वन
पण तरीही स्वस्थ न बसेन
करीन जागी प्रत्येक बहीण
स्त्रियांच्या राज्याची हीच हो खूण
दिवस सुगीचे ,पीक झोदण्याचे
जो तो उद्याचे स्वप्न पहातो
उभारलेली सोन्याची कनसे
पाहुनी मनी लाई उभारतो
शेतांच्या मधुनी जाई पायवाट
त्यावारुनी चाले पहा कशी नीट
खेद्यातली नारी,कणसावनी तट्ट
लागे कोणाच्या नजरेची द्रष्ट
बाजूस कोणीनही पाहात
रगेल गड्याचा पडलाच हात
क्षणात झाले होत्याचे नव्हते
निष्पाप नारीचे सर्वस्व हरपले
युगायुगंची ही रडकथा
इतक्या वर्षांनी थांबली आता
जनांची निंदा सहन करीन
बालाला तशीच जन्म देइन
उभा करीन पुरावा ,डीएनए परीक्षा देउन
अपराध्याला शिक्षा करू दे शासन
तेव्हांच होइल माझे सांत्वन
पण तरीही स्वस्थ न बसेन
करीन जागी प्रत्येक बहीण
स्त्रियांच्या राज्याची हीच हो खूण
बुधवार, १५ जुलै, २००९
अक्षर आस्वाद-मासिक सभा
चार डोई जमुनिया ,घेऊ काव्याचा आनंद
बुडू ड़ोही आनंदाच्या ,क्षण सुखामध्ये धुंद
या पार्ल्यात सुंदर,प्रतिमासी येता तिसरा रविवार
भरणार कविकथाकारांचा दरबार,
सर्वांचा एक अक्षर-आस्वाद,एक आस्वाद सुंदर
अक्षर-आस्वदाच्या आभाळी
क्षणोक्षणी नवे काव्य अन गाणी
रमाकांतांनी दिशा दावीली 'काव्यकणा'तूनी
आम्हासारीखे नवोदित कवीही स्वानुभावातुनी कविता रचती
दरिया हां काव्याचा भिजवितो धरती
बुडू ड़ोही आनंदाच्या ,क्षण सुखामध्ये धुंद
या पार्ल्यात सुंदर,प्रतिमासी येता तिसरा रविवार
भरणार कविकथाकारांचा दरबार,
सर्वांचा एक अक्षर-आस्वाद,एक आस्वाद सुंदर
अक्षर-आस्वदाच्या आभाळी
क्षणोक्षणी नवे काव्य अन गाणी
रमाकांतांनी दिशा दावीली 'काव्यकणा'तूनी
आम्हासारीखे नवोदित कवीही स्वानुभावातुनी कविता रचती
दरिया हां काव्याचा भिजवितो धरती
शनिवार, ११ जुलै, २००९
पावसाळ्याच्या प्रारंभी
कुंद ही हवा
सुखावितो गारवा
वृध्दामनाअम्हां
छळितो दमा
नाहीतर बघा
तरुणपणी माझ्या
असतो मी कसा
शांत झोपलेला
ऊब दुलईची
हवीहवीशी कशी
मनात उरती
फक्त त्या स्मृती
सुखावितो गारवा
वृध्दामनाअम्हां
छळितो दमा
नाहीतर बघा
तरुणपणी माझ्या
असतो मी कसा
शांत झोपलेला
ऊब दुलईची
हवीहवीशी कशी
मनात उरती
फक्त त्या स्मृती
मंगळवार, ७ जुलै, २००९
शाळेत म्हटलेली कविता
विद्यार्थी :- जा जा लाकूडतोड्या,करिसी तू काय कर्म बापा हे
का नच तोडीसी तू वाळवीने पोखरलेली अशी झाडे ?
वाळवी नष्ट कराया जाळायला हवे वाळवीचे लाकूड
मग रान साफ़ होई साफ ,जसे नाक होते साफ़,
फिरवुनी अंगुली काढताच सर्व मेकूड!
मास्तर:-रे थांब ज़रा,घालावया पाठीत तुझ्या आणतो लाकूड ।
हे बोल एकता मास्तरांचे,
उडी मारुनी केले मी घराकडे कूच
का नच तोडीसी तू वाळवीने पोखरलेली अशी झाडे ?
वाळवी नष्ट कराया जाळायला हवे वाळवीचे लाकूड
मग रान साफ़ होई साफ ,जसे नाक होते साफ़,
फिरवुनी अंगुली काढताच सर्व मेकूड!
मास्तर:-रे थांब ज़रा,घालावया पाठीत तुझ्या आणतो लाकूड ।
हे बोल एकता मास्तरांचे,
उडी मारुनी केले मी घराकडे कूच
रविवार, ५ जुलै, २००९
लाजवंती
सांगू कशी,सांगू कशी ,
गोष्ट अशी मी सांगू कशी !ध्रु !
लाज वाटते जगावेगळ काही घडलय का ?
माझच काही बिघडलय का
सांगू कशी ---
नव्हते गेले करवंदाच्या जाळीमंदी
नव्हते रूपले अंगभर कुठे काटेकुटे
बगा पारकर तरी का फाटलाय कुठे
तरीपण इतुका रगताचा जणू डाग उठे ,
सांगू कशी ------
विपरीत काही घडलय ग
माझच काहीतरी चुकलय ग
तोंडावरती मुरुम पुटकुळ्या
आपसुक कशा काय फुटल्यात ग ?सांगू कशी--
चिंचा आवळे,कधी न पाडले
अंगणात जाऊंन दुसर्यांच्या,
वाडीत घुसून कोवळ्या काकड्या
कधीच नाही बाई काढल्या
पापे असली कधी न केली
एक मातृ मी गलती केली
मळावरती द्वाड चंदूने
शीळ घालूनी खुणावता मज
कया माझी थरथरली
ह्याच लहानग्या चुकीसाठी का
देवाजीने का हाणली काठी
ह्यालाच का जगी म्हणती
कालची बछडी मोठी झाली ?
सांगू कशी सांगू कशी ---
गोष्ट अशी मी सांगू कशी !ध्रु !
लाज वाटते जगावेगळ काही घडलय का ?
माझच काही बिघडलय का
सांगू कशी ---
नव्हते गेले करवंदाच्या जाळीमंदी
नव्हते रूपले अंगभर कुठे काटेकुटे
बगा पारकर तरी का फाटलाय कुठे
तरीपण इतुका रगताचा जणू डाग उठे ,
सांगू कशी ------
विपरीत काही घडलय ग
माझच काहीतरी चुकलय ग
तोंडावरती मुरुम पुटकुळ्या
आपसुक कशा काय फुटल्यात ग ?सांगू कशी--
चिंचा आवळे,कधी न पाडले
अंगणात जाऊंन दुसर्यांच्या,
वाडीत घुसून कोवळ्या काकड्या
कधीच नाही बाई काढल्या
पापे असली कधी न केली
एक मातृ मी गलती केली
मळावरती द्वाड चंदूने
शीळ घालूनी खुणावता मज
कया माझी थरथरली
ह्याच लहानग्या चुकीसाठी का
देवाजीने का हाणली काठी
ह्यालाच का जगी म्हणती
कालची बछडी मोठी झाली ?
सांगू कशी सांगू कशी ---
गुरुवार, २ जुलै, २००९
तूच माझा naatewaaik
तूच माझा नातेवाईक
जुळले नाते
परमेश्वराशी
खातो मी तुपशी
तरी मी उपाशी
तहान भक्तिची
काही केल्या भागेना
त्य महान शक्तिची
गांठ काहे पडेना
तूप चिकटे घशाला
नाक नकटे चालेना
कंठ आवाज देइना
घेऊ कसे रामनामाला
मन जुळले तुझ्याशी
जुळले नाते परमेश्वराशी
जुळले नाते
परमेश्वराशी
खातो मी तुपशी
तरी मी उपाशी
तहान भक्तिची
काही केल्या भागेना
त्य महान शक्तिची
गांठ काहे पडेना
तूप चिकटे घशाला
नाक नकटे चालेना
कंठ आवाज देइना
घेऊ कसे रामनामाला
मन जुळले तुझ्याशी
जुळले नाते परमेश्वराशी
मंगळवार, ३० जून, २००९
कन्या माझी लाडकी
कविता आहे माझी कन्या
हवी तर तिला सासरी न्या
पण एवढी तरी कृपा करा
एक दिवस तरी द्या माहेरा[[
मला प्रिय आहे बालपणची छबी
परकर पोलका अन घट्ट वेणीतली
वेणीत वेणी फुलांची, त्यांत करवंदे
तुम्हाला वाटेल गावठी तर वाटू दे।
सासरी तिला तुम्ही कशीही नटवा
व्रुताचा ड्रेस नाहीतर चालीची सडी नेसवा
झोपाळ्यावर झुलवा किंवा मखरात बसवा
माहेरची सय येता तिने गाळू नयेत आसवा
माहेरी मात्र कसाही वागण्याचा चेक द्या कोरा
माझ्या आठवणीत रहावा तिचा मुळचाच चेहरा
म्हणून एक दिवस तरी द्या माहेरा ,
एक दिवस तरी द्या माहेरा .
हवी तर तिला सासरी न्या
पण एवढी तरी कृपा करा
एक दिवस तरी द्या माहेरा[[
मला प्रिय आहे बालपणची छबी
परकर पोलका अन घट्ट वेणीतली
वेणीत वेणी फुलांची, त्यांत करवंदे
तुम्हाला वाटेल गावठी तर वाटू दे।
सासरी तिला तुम्ही कशीही नटवा
व्रुताचा ड्रेस नाहीतर चालीची सडी नेसवा
झोपाळ्यावर झुलवा किंवा मखरात बसवा
माहेरची सय येता तिने गाळू नयेत आसवा
माहेरी मात्र कसाही वागण्याचा चेक द्या कोरा
माझ्या आठवणीत रहावा तिचा मुळचाच चेहरा
म्हणून एक दिवस तरी द्या माहेरा ,
एक दिवस तरी द्या माहेरा .
शनिवार, २७ जून, २००९
गुरुवार, २५ जून, २००९
हुरलून नाही गेलो (रामबाणवर)
पाठ थोपटून घेतानाही थरथर जाणवते
थोपटणा-या ची अंगठी खङा जणू रुपवाते
कविता भन्नट आहे,आवडली आपल्याला
असे म्हणणा-या चा एक डोला मिटलेल्ला
त्याची द्रष्टी संकुचित तर नाही ना
ही काळजी लागून राहते मना
श्रोत्यावर मनापासून प्रेम असते ना
म्हणूनच काळजी,जशी मुलांची आयांना
उपदेश कुठलाही करत नाही त्याला
पण एक सांगतो त्याचा विचार भला
दोन्ही डोळ्यांनी पहाल तर नीट दिसेल
समोरच्या वस्तूचे मोजमाप काय असेल
कवि पृथ्वीकडे पहातो एक आई म्हणून
तसेच कल्पना चावला सारखा दुरून दुरून
मराठीत ग्रह सारे आहेत पुल्लिंगी
पण पृथ्वी एकटीच स्त्रीलिंगी
म्हणून तिची तुलना केली स्त्रीशी
केली तर कुठे शिंकली माशी
पण हेही खरेच आहे
की स्त्री ही माता आहे
म्हणूनच ती पूज्य आहे
हे विसरले तर मात्र सारेच पूज्य आहे
थोपटणा-या ची अंगठी खङा जणू रुपवाते
कविता भन्नट आहे,आवडली आपल्याला
असे म्हणणा-या चा एक डोला मिटलेल्ला
त्याची द्रष्टी संकुचित तर नाही ना
ही काळजी लागून राहते मना
श्रोत्यावर मनापासून प्रेम असते ना
म्हणूनच काळजी,जशी मुलांची आयांना
उपदेश कुठलाही करत नाही त्याला
पण एक सांगतो त्याचा विचार भला
दोन्ही डोळ्यांनी पहाल तर नीट दिसेल
समोरच्या वस्तूचे मोजमाप काय असेल
कवि पृथ्वीकडे पहातो एक आई म्हणून
तसेच कल्पना चावला सारखा दुरून दुरून
मराठीत ग्रह सारे आहेत पुल्लिंगी
पण पृथ्वी एकटीच स्त्रीलिंगी
म्हणून तिची तुलना केली स्त्रीशी
केली तर कुठे शिंकली माशी
पण हेही खरेच आहे
की स्त्री ही माता आहे
म्हणूनच ती पूज्य आहे
हे विसरले तर मात्र सारेच पूज्य आहे
सोमवार, २२ जून, २००९
किशोरीम्चे गाणे (चाल चला चला ग सयांनो )
या ग या,या ग या,या ग या,
सख्यांनो,माझ्या ग ,संगती खेळाया[ध्रु ]
ष्रावणसरींच्या शिडकाव्याखाली
केसांची बट ही झुकली कपाळी
घरात म्हणू दे आईला भूपाळी
आपण मोकाट हिन्डू रानोमाळी[१]
झाडांना बान्धूया दोरांचे झोपाळे
मुलिम्नो घेऊ या आपण हिंदोळे
डोंगर हिरव्या शाली लपेटती
दुधाळ फेसाळ धारा झेपावाती[2]
खड़क ओले हे हळूच ओलांडी
बेडूक पाहून जाईल झोकांडी
त्यांना गिळण्याला येइल नागीण
भिऊ नको आला पंचमीचा सण[३]
या ग या,या ग या,या ग या,या ग या
सख्यांनो ,माझ्या ग, संगती खेळाया
सख्यांनो,माझ्या ग ,संगती खेळाया[ध्रु ]
ष्रावणसरींच्या शिडकाव्याखाली
केसांची बट ही झुकली कपाळी
घरात म्हणू दे आईला भूपाळी
आपण मोकाट हिन्डू रानोमाळी[१]
झाडांना बान्धूया दोरांचे झोपाळे
मुलिम्नो घेऊ या आपण हिंदोळे
डोंगर हिरव्या शाली लपेटती
दुधाळ फेसाळ धारा झेपावाती[2]
खड़क ओले हे हळूच ओलांडी
बेडूक पाहून जाईल झोकांडी
त्यांना गिळण्याला येइल नागीण
भिऊ नको आला पंचमीचा सण[३]
या ग या,या ग या,या ग या,या ग या
सख्यांनो ,माझ्या ग, संगती खेळाया
शनिवार, २० जून, २००९
रामबाण
हिन्दुकुशाच्या घलीतुनी जाई सिंधु
जसे छातीच्या बुरुजातुनी घर्मबिंदु
चला,अडवू तरी तिचे पानी
घडा पापांचा भरलाय गीडवानी
पाणी अड़वुनी होणार नाही पाप
जगह मारया उद्युक्त असे पाक
जसे छातीच्या बुरुजातुनी घर्मबिंदु
चला,अडवू तरी तिचे पानी
घडा पापांचा भरलाय गीडवानी
पाणी अड़वुनी होणार नाही पाप
जगह मारया उद्युक्त असे पाक
शुक्रवार, १९ जून, २००९
नाती
नववाधूचे आसू पुसती
माहेरची मायेची नाती
नवी जोडण्या हवीच प्रीती
पतिदेवासह परिवारावरती।
जसे पिल्लू कोकिळेचे
जन्म घेउनी काकाच्या घरटी
निसर्गाप्रेरित नसेल माया
तरी कावळीस म्हणेल आया
एक बारे तरी पक्ष्यांमधली
नसते पद्धत जौइंट फामिली
असती तर मग याशोदामाइचे
कृष्ण गाईला जसा गोडवे
कोकिळ्कंठातून उमटले की
असते स्वर जय काकी काकी
मानवाचे तर सारे न्यारे
सासू सूनेतुनी विस्तव जाई
पुत्र पित्यास पण म्हणतो का रे
पत्नीला मम छळते आई?
माहेरची मायेची नाती
नवी जोडण्या हवीच प्रीती
पतिदेवासह परिवारावरती।
जसे पिल्लू कोकिळेचे
जन्म घेउनी काकाच्या घरटी
निसर्गाप्रेरित नसेल माया
तरी कावळीस म्हणेल आया
एक बारे तरी पक्ष्यांमधली
नसते पद्धत जौइंट फामिली
असती तर मग याशोदामाइचे
कृष्ण गाईला जसा गोडवे
कोकिळ्कंठातून उमटले की
असते स्वर जय काकी काकी
मानवाचे तर सारे न्यारे
सासू सूनेतुनी विस्तव जाई
पुत्र पित्यास पण म्हणतो का रे
पत्नीला मम छळते आई?
सोमवार, १५ जून, २००९
श्रद्घा
पाउस रिप रिप पडतो आहे
जागोजागी चिखल झाला आहे
चिखलात रुतले जरी पाउल
तरी मनाचा,ढळू देऊ नाका तोल
जीवन हे असेच डबकेआहे
त्यांत रुतालेल्यांना ते जाणवत नाही
पाण्यात रहाणार्या माशांनाही
बाहेरच्या जीवनाची कल्पना नाही
मासे जसे पाण्यांतुनच वायु खेचतात
तसे आपणही चिखलात प्राणवायु घेतो
कोणाच्या जीवनाच्या गाडीचे तर
एक चाक गेले तरी ती फिरते आ-यावर
ओढणारे बैल तर केव्हांच गल्ले असतात
दुसर्या गाडीचा शोध घेत असतात
पंतुम्ही मुळीच घाबरू नाका
चिखालाताल्या गाडीला असतो फुगा
गाडीच्या जूला उचलून धरतो
त्यालाच आपण श्रद्घा म्हणतो।
D
जागोजागी चिखल झाला आहे
चिखलात रुतले जरी पाउल
तरी मनाचा,ढळू देऊ नाका तोल
जीवन हे असेच डबकेआहे
त्यांत रुतालेल्यांना ते जाणवत नाही
पाण्यात रहाणार्या माशांनाही
बाहेरच्या जीवनाची कल्पना नाही
मासे जसे पाण्यांतुनच वायु खेचतात
तसे आपणही चिखलात प्राणवायु घेतो
कोणाच्या जीवनाच्या गाडीचे तर
एक चाक गेले तरी ती फिरते आ-यावर
ओढणारे बैल तर केव्हांच गल्ले असतात
दुसर्या गाडीचा शोध घेत असतात
पंतुम्ही मुळीच घाबरू नाका
चिखालाताल्या गाडीला असतो फुगा
गाडीच्या जूला उचलून धरतो
त्यालाच आपण श्रद्घा म्हणतो।
D
शनिवार, १३ जून, २००९
पवनपुत्र हनुमान
पूर्वेकडल्या डोंगरामधुनी उगवे सूर्यबिंब लाल ते
जन्मताची जे पवानापुत्र झणी धावे पकडायाते
निरागस असे बालक जरी ते ,सहजच उचालील सूर्य
भीतीने या सोडी इन्द्र तो महाकठिण ते वज्र
बालक परी महा पराक्रमी ते हनुवरी झेली वज्र,
परतुनी जाई अमोघ अस्त्र ते करुनी छोटा व्रण
युद्धाप्रसंगाचा झाला त्या ,अशा रीतीने अंत
वीराचे त्या तेव्हांपासुनी नाव पड़े हनुमंत
जन्मताची जे पवानापुत्र झणी धावे पकडायाते
निरागस असे बालक जरी ते ,सहजच उचालील सूर्य
भीतीने या सोडी इन्द्र तो महाकठिण ते वज्र
बालक परी महा पराक्रमी ते हनुवरी झेली वज्र,
परतुनी जाई अमोघ अस्त्र ते करुनी छोटा व्रण
युद्धाप्रसंगाचा झाला त्या ,अशा रीतीने अंत
वीराचे त्या तेव्हांपासुनी नाव पड़े हनुमंत
बुधवार, १० जून, २००९
पण तरीही
पुढे चालू
ती करता करता घसरत जातो
मला वाटत की मी करतोय गाणं
खरं तर तो लोकांच्या कानावर
आघातच असतो ,आघातच असतो ।
(सौजन्य:.आमची शाखा कोठेही नाही -सह्याद्री वाहीनी)
ती करता करता घसरत जातो
मला वाटत की मी करतोय गाणं
खरं तर तो लोकांच्या कानावर
आघातच असतो ,आघातच असतो ।
(सौजन्य:.आमची शाखा कोठेही नाही -सह्याद्री वाहीनी)
पण तरीही
गाणे मला जमात नाही
ताल मला समजत नाही
रागदारी तर उमजतच नाही
असं सगळं आहे,पण तरीही--
मी गाण्यात गुंगतच जातो
कारण माझा कान ,गाण्याकडे असतो
अन याहून महत्वाच काय
तर बुडत्याचा खोलात पाय
या न्यायाने मी कधी कधी कविता करतो
पुढे वाचा
ताल मला समजत नाही
रागदारी तर उमजतच नाही
असं सगळं आहे,पण तरीही--
मी गाण्यात गुंगतच जातो
कारण माझा कान ,गाण्याकडे असतो
अन याहून महत्वाच काय
तर बुडत्याचा खोलात पाय
या न्यायाने मी कधी कधी कविता करतो
पुढे वाचा
बुधवार, ३ जून, २००९
आरती 'सोबती'ची
संकटी , मम एकटेपणावर उपचार हाची 'सोबती'माझ्यापरी ,ज्येष्टजन हे मित्र होउनी ,सोबतीताच भेटती (ध्रु)
जयेष्ट नागरीक,आम्ही जरी ,सोबतीतिल जन सारे ,
आम्हांसाठी सुखावून जाती ,विचारांचे,नवयुगातील वारे।
विद्वान्,कसबी.प्रसिद्ध नेते,पाचारीत ही सोबती
संकटी ,मम एकटेपणावर ,उपचार हाची 'सोबती' !!
जुन्या म्हणींना रजा देऊनी, नवी घदविली अशी
जाशील बुधी, तर येशील 'कधी'नव्हे, तर येशील सोबतीमधी
सोबतीची सभा तर पार्ल्यामधी,बाहर आम्ही जाणार कधी
संकटी ,मम एकटेपणावर ---
बुधवारची आम्ही वाट पाहतो ,उत्कंठेने,बोधामृत चर्चेसाठी
नाट्य.संगीत,साहित्यातही तसेच रमतो ,दमतो खेळातही
सहलीताही सामील होती तेही ज्यांना चालायाला लागे काठी
संकटी मम एकटेपणावर--
जयेष्ट नागरीक,आम्ही जरी ,सोबतीतिल जन सारे ,
आम्हांसाठी सुखावून जाती ,विचारांचे,नवयुगातील वारे।
विद्वान्,कसबी.प्रसिद्ध नेते,पाचारीत ही सोबती
संकटी ,मम एकटेपणावर ,उपचार हाची 'सोबती' !!
जुन्या म्हणींना रजा देऊनी, नवी घदविली अशी
जाशील बुधी, तर येशील 'कधी'नव्हे, तर येशील सोबतीमधी
सोबतीची सभा तर पार्ल्यामधी,बाहर आम्ही जाणार कधी
संकटी ,मम एकटेपणावर ---
बुधवारची आम्ही वाट पाहतो ,उत्कंठेने,बोधामृत चर्चेसाठी
नाट्य.संगीत,साहित्यातही तसेच रमतो ,दमतो खेळातही
सहलीताही सामील होती तेही ज्यांना चालायाला लागे काठी
संकटी मम एकटेपणावर--
सोमवार, १ जून, २००९
गारवा
गारवा जिवाला हवा
एकमेव सुखाचा ठेवा !!
शुद्ध निसर्गाचे दान
पूर्ण सुखाचे निदान
होरपळल्या देहासाठी
वाहत्या ओढ्याच्या काठी
जसा पाण्याचा शिडकावा
तसा ग्रीष्मानंतरचा गारवा
गारवा जिवाला हवा
एकमेव सुखाचा ठेवा
एकमेव सुखाचा ठेवा !!
शुद्ध निसर्गाचे दान
पूर्ण सुखाचे निदान
होरपळल्या देहासाठी
वाहत्या ओढ्याच्या काठी
जसा पाण्याचा शिडकावा
तसा ग्रीष्मानंतरचा गारवा
गारवा जिवाला हवा
एकमेव सुखाचा ठेवा
गुरुवार, २८ मे, २००९
ज्येष्टांची कुरबुर
मज नको तुमचे तळलेले वडे बीडे
वा नको दारूचा थेंब कराया ओले माझे ओष्ट
मज पूर्वीपासून सारे जरी का फार आवडे
तरी आता झालो आहे मी एक जयेष्ट
सुंदर तरुणीचे नृत्य पहाया होई तेव्हा मी उत्सुक
आता पण मी नाक मुरडतो पाहून टी वी वरचे एकापेक्षा एक
गाण्यांमध्ये मला आवडे सर्वाधिक लावणी
अता परंतु भजनाविना ऐकत नाही गाणी
एक चांगले परंतु झाले इतक्या वर्षांनी
बळगोपाळांची कटकट आता पूर्वीसराखी मुळीच वाटत नाही
वा नको दारूचा थेंब कराया ओले माझे ओष्ट
मज पूर्वीपासून सारे जरी का फार आवडे
तरी आता झालो आहे मी एक जयेष्ट
सुंदर तरुणीचे नृत्य पहाया होई तेव्हा मी उत्सुक
आता पण मी नाक मुरडतो पाहून टी वी वरचे एकापेक्षा एक
गाण्यांमध्ये मला आवडे सर्वाधिक लावणी
अता परंतु भजनाविना ऐकत नाही गाणी
एक चांगले परंतु झाले इतक्या वर्षांनी
बळगोपाळांची कटकट आता पूर्वीसराखी मुळीच वाटत नाही
बुधवार, २७ मे, २००९
चंद्र आणि भूमी
पुनावेला कोजागिरी, चंद्राची पहावी निळाइ
संतानी जशी पाहिली ,सावळ्या विठ्ठलाच्या ठाइ
पूर्नाचाम्द्राचे चांदणे.मना करी शांत शांत,
जन शिवाची भजने, भाव भक्तिने गातात
अश्विनाच्या शुद्ध पक्षाच्या अंती येई कोजागिरी
कोणी म्हणे शरद पोर्णिमा ,शिवदूतांची येते फेरी
को जागर्ति,को जागर्ति ,त्यांची एकच आरोळी
भजनात जाई विरोनी,निजलेले नसावे कोणी
जाग असो दया बंधू ,देहाची तसे मनाची
भूमी व्यापन्या मग तुमची ,माय व्याली कोणाची.
संतानी जशी पाहिली ,सावळ्या विठ्ठलाच्या ठाइ
पूर्नाचाम्द्राचे चांदणे.मना करी शांत शांत,
जन शिवाची भजने, भाव भक्तिने गातात
अश्विनाच्या शुद्ध पक्षाच्या अंती येई कोजागिरी
कोणी म्हणे शरद पोर्णिमा ,शिवदूतांची येते फेरी
को जागर्ति,को जागर्ति ,त्यांची एकच आरोळी
भजनात जाई विरोनी,निजलेले नसावे कोणी
जाग असो दया बंधू ,देहाची तसे मनाची
भूमी व्यापन्या मग तुमची ,माय व्याली कोणाची.
सोमवार, २५ मे, २००९
कोणी कोणाचे नाही
आज पुन्हा वाटे मजला ,असे एकटा मी
आज परी घडले आहे,असे काय नामी
येशी तैसा जाशी एकटा ,म्हणती थोर सारे
मग कां जोडावी ही नाती, कारणाविना रे?
ह्रुदयातुनी पिळवटलेली, साद जों मिळाली
स्नेहबंधनांनी जेथे नसा नस जुळविली
तेथे नाते जे कां जुळते,नाव नाही त्याला
तेच खरे नाते असते, कधी न जाई लयाला
तेच खरे नाते असते,कधी न जाई लयाला
आज परी घडले आहे,असे काय नामी
येशी तैसा जाशी एकटा ,म्हणती थोर सारे
मग कां जोडावी ही नाती, कारणाविना रे?
ह्रुदयातुनी पिळवटलेली, साद जों मिळाली
स्नेहबंधनांनी जेथे नसा नस जुळविली
तेथे नाते जे कां जुळते,नाव नाही त्याला
तेच खरे नाते असते, कधी न जाई लयाला
तेच खरे नाते असते,कधी न जाई लयाला
रविवार, २४ मे, २००९
मझ्या आठवणीतला पहिला पाउस
माझ्या आठवणीतला पहिला पाउस किती जोरदार
हरवला नदीकाठ, पाण्याला कोण अडवणार?
शाळा माझी एका कांठीं,गाव दुसर्या कांठावर
अवघा एकच अरुंद पूल .शाला गावाला जोडणार
जातां पानी पुलावरुनी शाळेला होई सुट्टी
पानी लागता उंबर्याला,सोडल्या कागदाच्या बोटी
घरी बसल्या बसल्या आमची होइ करमणूक
स्म्रुती वासिष्ठीच्या बालमनीच्या ,अजूनी केली जपणूक
अतां वाटते, तेव्हांच अडवले असते पाणी
सह्याद्रिच्या पोटी खणून वळविले असते पाणी
तर देशावरी,झाला नसता दुष्काळ
आज आहे तसा,नसता दरोडेखोरांचा सुकाळ
हरवला नदीकाठ, पाण्याला कोण अडवणार?
शाळा माझी एका कांठीं,गाव दुसर्या कांठावर
अवघा एकच अरुंद पूल .शाला गावाला जोडणार
जातां पानी पुलावरुनी शाळेला होई सुट्टी
पानी लागता उंबर्याला,सोडल्या कागदाच्या बोटी
घरी बसल्या बसल्या आमची होइ करमणूक
स्म्रुती वासिष्ठीच्या बालमनीच्या ,अजूनी केली जपणूक
अतां वाटते, तेव्हांच अडवले असते पाणी
सह्याद्रिच्या पोटी खणून वळविले असते पाणी
तर देशावरी,झाला नसता दुष्काळ
आज आहे तसा,नसता दरोडेखोरांचा सुकाळ
शनिवार, २३ मे, २००९
नवकविची व्यथा
अशी कशी छंदोमयी
करणार मी कविता
धडपड चालू राही
जोवरी चंद्रसविता
अक्षरे मोजकी हवी
एक ना जास्त वा कमी
शब्द उलटेपालटे
कसेही करणे चाले
असे शब्द निवडावे
सीमित अक्षरा भावे
अर्थास त्यातुनी घ्यावे
कसेतरी समजोनी
भाव मुके ती कविता
नैसर्गिकता नुरता
लागते असे बोलाया
कविंनो तुम्ही का विता?
करणार मी कविता
धडपड चालू राही
जोवरी चंद्रसविता
अक्षरे मोजकी हवी
एक ना जास्त वा कमी
शब्द उलटेपालटे
कसेही करणे चाले
असे शब्द निवडावे
सीमित अक्षरा भावे
अर्थास त्यातुनी घ्यावे
कसेतरी समजोनी
भाव मुके ती कविता
नैसर्गिकता नुरता
लागते असे बोलाया
कविंनो तुम्ही का विता?
सोमवार, १८ मे, २००९
धोंडोपंत उवाच: योगायोग ?
धोंडोपंत उवाच: योगायोग ?sarvavidwan logaMna maajhee vinaMtee ahe ki viduraaMchyaa aayushyaat grahaaMchaa prabhaaw kaaheesaa wegaLaa asato kaa he spaShtakaraawe
पहीले मराठी संत
वेदांनीही नाही स्पर्शिले अजुनी ज्याला
तयाप्रती घेवूनी जाई आम्हा ज्यांची लीला
त्या थोर मराठी संताचे नाव न लिहिता येई
ही इतुकी का कोपली आम्हावर आई
तयाप्रती घेवूनी जाई आम्हा ज्यांची लीला
त्या थोर मराठी संताचे नाव न लिहिता येई
ही इतुकी का कोपली आम्हावर आई
रविवार, १० मे, २००९
शेतकर्यांचे गाने ६-३०-०३ भाग २
येता सत्तेवारी इंदिरा प्रियदर्शिनी
भेटुनी तिला उतरवी योजना ती कागदावरी
अखेर कोठे एकविसाव्या शतका आरंभी
वाळवंटीच्या जने चाखले प्रथम नदीचे पाणी
परी आजही इथे,वा तिथे विदर्भी
शेतकर्यांची दृष्टी वळते वरती नभी
मोसमी वारे येताना तो करी तोच पुकार,
पावसा ,येई रे धुवाधार .तोच जीवा आधार .
भेटुनी तिला उतरवी योजना ती कागदावरी
अखेर कोठे एकविसाव्या शतका आरंभी
वाळवंटीच्या जने चाखले प्रथम नदीचे पाणी
परी आजही इथे,वा तिथे विदर्भी
शेतकर्यांची दृष्टी वळते वरती नभी
मोसमी वारे येताना तो करी तोच पुकार,
पावसा ,येई रे धुवाधार .तोच जीवा आधार .
शेताकरयाचे गाणे ६.302003
पावसा येई रे धुवांधार
रे गड्या ,तूच जीवा आधार,पावसा तूच जीवा आधार
क्रुष्णाखोरी बहुत वाहिली संपत्ति ही अपार
करिती कृपा शरदराव पवार
तरी रे,पाण्याला ना पार
पावसा ,तूच जीवा आधार ।
कोण एक तो वसंत दूरदर्शी
कसरी योजना नद्यानद्यांना जोडून घेण्याची
भेट घेवूनी लाल बहादुर शास्त्रीजींची
त्यांना पटली योजना ही बहुगुणी साची
कारकीर्दा परी अल्पची ठरली त्या शास्त्रीजीम्ची
पुढे पहा
रे गड्या ,तूच जीवा आधार,पावसा तूच जीवा आधार
क्रुष्णाखोरी बहुत वाहिली संपत्ति ही अपार
करिती कृपा शरदराव पवार
तरी रे,पाण्याला ना पार
पावसा ,तूच जीवा आधार ।
कोण एक तो वसंत दूरदर्शी
कसरी योजना नद्यानद्यांना जोडून घेण्याची
भेट घेवूनी लाल बहादुर शास्त्रीजींची
त्यांना पटली योजना ही बहुगुणी साची
कारकीर्दा परी अल्पची ठरली त्या शास्त्रीजीम्ची
पुढे पहा
मंगळवार, ५ मे, २००९
श्री गणेश वंदन भाग 2
सिंदूर नामक मत्ता राक्षस भूमीला भार जाहला
युक्तिशाक्ती दोन्ही तुजपाशी सिन्दुरासुर तू मारिला
लाल रक्त त्याचे उडोनी देह तुझा न्हाला रक्ती तो
म्हणूनी आम्ही विनायकाच्या दगडी मूर्तीला शेंदूर फासतो
अनेक सत्वे एकवटुनी पार्वतीमाता भरावी मोदक तुला
म्हणुनी आम्ही जीवनसत्वे सारी भरोनी दावू मोदक तुला
पूजेतुनी वा तुझ्या प्रसादे शक्तीयुक्ति आम्हा मिळो
उग्र रूप आमुचे बघुनी येथुनी दहशतवादी पळो
युक्तिशाक्ती दोन्ही तुजपाशी सिन्दुरासुर तू मारिला
लाल रक्त त्याचे उडोनी देह तुझा न्हाला रक्ती तो
म्हणूनी आम्ही विनायकाच्या दगडी मूर्तीला शेंदूर फासतो
अनेक सत्वे एकवटुनी पार्वतीमाता भरावी मोदक तुला
म्हणुनी आम्ही जीवनसत्वे सारी भरोनी दावू मोदक तुला
पूजेतुनी वा तुझ्या प्रसादे शक्तीयुक्ति आम्हा मिळो
उग्र रूप आमुचे बघुनी येथुनी दहशतवादी पळो
श्री गणेश वंदन
प्रथम वंदन तुला करती म्हणून नाव प्रथमेश
श्री शम्करान तुला नेमले नायक गणांचा इती श्रीगणेश
लोककथा ही तुला घडविले जगन्मातेने मळातुनि
म्हणुनी मूर्ती तुझी घडवितो आम्ही मातीतुनी
मूर्ती असो मातीची जरी ,पूज्य भावना सुवर्णाची
भक्ती असे सकलांची,ना मक्तेदारी कुणा सवर्णांची
पाच दिवस जरी तुला पूजितो कामे बाजू ठेवूनी
मनात करतो तुझी स्थापना,बारमास तुज आठवूनी
पुढे चालू
श्री शम्करान तुला नेमले नायक गणांचा इती श्रीगणेश
लोककथा ही तुला घडविले जगन्मातेने मळातुनि
म्हणुनी मूर्ती तुझी घडवितो आम्ही मातीतुनी
मूर्ती असो मातीची जरी ,पूज्य भावना सुवर्णाची
भक्ती असे सकलांची,ना मक्तेदारी कुणा सवर्णांची
पाच दिवस जरी तुला पूजितो कामे बाजू ठेवूनी
मनात करतो तुझी स्थापना,बारमास तुज आठवूनी
पुढे चालू
शनिवार, २ मे, २००९
मुंगी
एक होती मुंगी
तिने नेसली लुंगी
नार्वेकरांचा हां जर्म
ऐकून मला आली गुंगी
नार्वेकराम्ची प्रतिभा अशी
की तिच्यापुढे मोठे मोठे कवि
टाकतील नंगी
पण आमच्यासारखे लुंगेसुंगे
मात्र म्हणतील उठा
आता चला 'आदर' ला
कारण आपण सगळे चंगीभंगी
तिने नेसली लुंगी
नार्वेकरांचा हां जर्म
ऐकून मला आली गुंगी
नार्वेकराम्ची प्रतिभा अशी
की तिच्यापुढे मोठे मोठे कवि
टाकतील नंगी
पण आमच्यासारखे लुंगेसुंगे
मात्र म्हणतील उठा
आता चला 'आदर' ला
कारण आपण सगळे चंगीभंगी
गुरुवार, ३० एप्रिल, २००९
में डे
महाराष्ट्र दिन हाच जगभरी
कामगार दिनही असे तरी
त्या श्रमिकांची ठेवा आठवण
करीत नसती जे कसली साठवण।
तो काम करोनी अर्धपोटी
भरतो धनिकांची ओटी
शिक्षित होवूनी कच्ची बच्ची
त्यांना मिळू दे जागा वरची
असे विनवी सदा प्रभूला
आज जरी त्या नसे खायला
कामगार दिनही असे तरी
त्या श्रमिकांची ठेवा आठवण
करीत नसती जे कसली साठवण।
तो काम करोनी अर्धपोटी
भरतो धनिकांची ओटी
शिक्षित होवूनी कच्ची बच्ची
त्यांना मिळू दे जागा वरची
असे विनवी सदा प्रभूला
आज जरी त्या नसे खायला
मंगळवार, २८ एप्रिल, २००९
होली(भाग४)
अग्नि परी सांगे युक्ति
जा तुम्ही गोमातेप्रती
गोमय घेवूनी उन्हात सुकवुनी
शेनीवारी घ्या माझी शक्ति
शेणीवरी त्या अग्निशलाका
नेता प्रकटली प्रखर ज्वाला
ज्वालेतुनी त्या उभी जाहली
झळाळत लावण्यमयी देवी होळी
दुमदुमली मग तिन्ही लोकी
लावण्याची तिच्याच द्वाही
असुरासही मग मोह पड़े तो
विचारशक्ति नष्ट होवूनी
होलिकेस आलिंगन देई
भस्म होवून तिच्याच चरणी
राख राख गेला होवूनी
राखी पृथ्वीला होळी
म्हणुनी आजही करतो होळी
बिबल्यासही दूर राखते
अशी आपली पवित्र होळी।
टीप:-ही लांब लचक काल्पनिक कथा इथे संपली.बालांना पौराणीक कथांत रस वाटावा म्हणून हां प्रयत्न .परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने होळी करताना विचार करावा लागेल
जा तुम्ही गोमातेप्रती
गोमय घेवूनी उन्हात सुकवुनी
शेनीवारी घ्या माझी शक्ति
शेणीवरी त्या अग्निशलाका
नेता प्रकटली प्रखर ज्वाला
ज्वालेतुनी त्या उभी जाहली
झळाळत लावण्यमयी देवी होळी
दुमदुमली मग तिन्ही लोकी
लावण्याची तिच्याच द्वाही
असुरासही मग मोह पड़े तो
विचारशक्ति नष्ट होवूनी
होलिकेस आलिंगन देई
भस्म होवून तिच्याच चरणी
राख राख गेला होवूनी
राखी पृथ्वीला होळी
म्हणुनी आजही करतो होळी
बिबल्यासही दूर राखते
अशी आपली पवित्र होळी।
टीप:-ही लांब लचक काल्पनिक कथा इथे संपली.बालांना पौराणीक कथांत रस वाटावा म्हणून हां प्रयत्न .परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने होळी करताना विचार करावा लागेल
होळी(सुधारित मुद्रण) भाग 3
ऐकुनी ते मनी हसून
"तथास्तु" ऐसे बोलून
ब्रह्मदेव मग तेथून
क्षणी होती अंतर्धान
असुर बहुत मातला
त्रिलोकी अजिंक्य जाहला
सुर मानव भयभीत
परमेशा शरणागत
"आता मात्र एक तुम्हा
अग्नीचा आधार हवा "
हां ऐकुनी उपदेश
इंद्रास येई आवेश
जाई तो अग्नीप्रती
मागान्यास त्याची शक्ती
(पुढील भाग नंतर वाचा)
"तथास्तु" ऐसे बोलून
ब्रह्मदेव मग तेथून
क्षणी होती अंतर्धान
असुर बहुत मातला
त्रिलोकी अजिंक्य जाहला
सुर मानव भयभीत
परमेशा शरणागत
"आता मात्र एक तुम्हा
अग्नीचा आधार हवा "
हां ऐकुनी उपदेश
इंद्रास येई आवेश
जाई तो अग्नीप्रती
मागान्यास त्याची शक्ती
(पुढील भाग नंतर वाचा)
सोमवार, २७ एप्रिल, २००९
होली(सुधारित मुद्रण) bhaag2
सर्व देव ब्रह्मासि
जावूनी ,मग आळविती
सोड़वी या त्रासातुनी
करिती त्यास विनती
ब्रह्मदेव प्रगटुनी
तापोभूमीवर येती
असुराला थोपवुनी
आशीर्वचना देती
"का कष्टसी सांग असा
काय हवे तुज वत्सा
सांग आता सत्वरी
प्रसन्न मी तुजवरी "
ऐकुनी ते बोल मधुर
उल्हसित मनी असुर
सांगे की ह्या भूवर
स्वर्गी वा पाताळी
शस्त्र न मम घात करी
ऐसा वर दे कृपा करी "
(पुढे नंतर वाचा)
जावूनी ,मग आळविती
सोड़वी या त्रासातुनी
करिती त्यास विनती
ब्रह्मदेव प्रगटुनी
तापोभूमीवर येती
असुराला थोपवुनी
आशीर्वचना देती
"का कष्टसी सांग असा
काय हवे तुज वत्सा
सांग आता सत्वरी
प्रसन्न मी तुजवरी "
ऐकुनी ते बोल मधुर
उल्हसित मनी असुर
सांगे की ह्या भूवर
स्वर्गी वा पाताळी
शस्त्र न मम घात करी
ऐसा वर दे कृपा करी "
(पुढे नंतर वाचा)
रविवार, २६ एप्रिल, २००९
होली (सुधारित मुद्रण)
असुरासही ज्ञ्न्यात होई
भक्तितुनी शक्ति मिले
तापातुने सामर्थ्य मिले
तिन्ही लोल जिंकण्यास
एकाच हां मार्ग असे।
ढोंग करुनी भक्तीचे
तो तप करण्यास बसे
नामस्मरण ब्रह्माचे
उच्चारत सतत बसे
गेली वर्शामागुनी वर्षे
तपोबल अधिकाधिक ते
होवूनी जड़ पृथ्वीला
आकाशा जालीत असे (पुढील भाग नंतर पहा)
भक्तितुनी शक्ति मिले
तापातुने सामर्थ्य मिले
तिन्ही लोल जिंकण्यास
एकाच हां मार्ग असे।
ढोंग करुनी भक्तीचे
तो तप करण्यास बसे
नामस्मरण ब्रह्माचे
उच्चारत सतत बसे
गेली वर्शामागुनी वर्षे
तपोबल अधिकाधिक ते
होवूनी जड़ पृथ्वीला
आकाशा जालीत असे (पुढील भाग नंतर पहा)
भाग २
स्वर्गी वा पाताळी अग्नी परी सांगे युक्ती म्हणुनी आजही करतो होळी
शस्त्र न मम घात करी जा तुम्ही गोमातेप्रती बिबळ्यासही दूर राखते
ऐसा वर दे क्रुपा करी गोमय उन्हात सुकवनी संजय गांधी उद्यानातुनी
ऐकुनी ते,मनी हासुनी शेणीवरी घ्या मम शक्ती अशी आपुली पवित्र होळी
"तथास्तु"ऐसे बोलुनी शेणीवरी त्याअग्निशलाका
ब्रह्मदेव मग तेथुन नेता,प्रकटली प्रखर ज्वाला
क्षणी होती अंर्तधान ज्वालेतुनी त्या उभी जाहली
असुर बहु मातला झळाळत लावण्यमय देवे होळी
त्रिलोकी अजिंक्य जाहला दुमदुमली लोकी तिन्ही
सुर मानव भयभीत लावण्याची तिच्याच द्वाही
परमेशा शरणागत असुरासही मोह पडे
आता मात्र एक तुम्हा लावण्याचा,धावत येइ
अग्निचा आधार हवा विचारशक्ती नष्ट होवूनी
हा ऐकुनी उपदेश होलिकेस आलिंगन देइ
इंद्रास येइ आवेश नष्ट होवूनीतिच्याच चरणी
जाइ तो अग्नीप्रती राख राख होवूनी गेली
मगण्यास त्याची शक्ती रखी प्रुथ्वीला होळी
शस्त्र न मम घात करी जा तुम्ही गोमातेप्रती बिबळ्यासही दूर राखते
ऐसा वर दे क्रुपा करी गोमय उन्हात सुकवनी संजय गांधी उद्यानातुनी
ऐकुनी ते,मनी हासुनी शेणीवरी घ्या मम शक्ती अशी आपुली पवित्र होळी
"तथास्तु"ऐसे बोलुनी शेणीवरी त्याअग्निशलाका
ब्रह्मदेव मग तेथुन नेता,प्रकटली प्रखर ज्वाला
क्षणी होती अंर्तधान ज्वालेतुनी त्या उभी जाहली
असुर बहु मातला झळाळत लावण्यमय देवे होळी
त्रिलोकी अजिंक्य जाहला दुमदुमली लोकी तिन्ही
सुर मानव भयभीत लावण्याची तिच्याच द्वाही
परमेशा शरणागत असुरासही मोह पडे
आता मात्र एक तुम्हा लावण्याचा,धावत येइ
अग्निचा आधार हवा विचारशक्ती नष्ट होवूनी
हा ऐकुनी उपदेश होलिकेस आलिंगन देइ
इंद्रास येइ आवेश नष्ट होवूनीतिच्याच चरणी
जाइ तो अग्नीप्रती राख राख होवूनी गेली
मगण्यास त्याची शक्ती रखी प्रुथ्वीला होळी
होळीची प्रथा (एक काल्पनिक
असुरासही न्यात होइ सर्व देव ब्रह्मासि
भक्तितुनी शक्ती मिळे जाउनी मग आळविति
तपातुनी सामर्थ्य मिळे सोडव ह्या त्रासातुनी
तिन्ही लोक जिंकण्यास करिति त्याला विनती।
एकच हा मार्ग असे ब्रह्मदेव प्रगटुनी
एकच हा मार्ग असे तपोभूमीवर येती
ढोन्ग करुन भक्तिचे असुराला थोपवुनी
तो तप करण्या बसे आशीर्वचनाला देति
नामस्मरण ब्रह्माचे "का कष्टसी सांग असा,
उच्चारत सतत बसे काय हवे तुज वत्सा
गेली वर्षामागुनी वर्षे माग आता सत्वरी
तपोबल अधिकाधिक ते प्रसन्न मी तुजवरी"
होवूनी जड प्रुथ्वीला ऐकुनी ते बोल मधुर
आकाशा जाळीतसे उल्हसित मनी असुर
सांगे की ह्या भूवर (भाग २ पहा)
भक्तितुनी शक्ती मिळे जाउनी मग आळविति
तपातुनी सामर्थ्य मिळे सोडव ह्या त्रासातुनी
तिन्ही लोक जिंकण्यास करिति त्याला विनती।
एकच हा मार्ग असे ब्रह्मदेव प्रगटुनी
एकच हा मार्ग असे तपोभूमीवर येती
ढोन्ग करुन भक्तिचे असुराला थोपवुनी
तो तप करण्या बसे आशीर्वचनाला देति
नामस्मरण ब्रह्माचे "का कष्टसी सांग असा,
उच्चारत सतत बसे काय हवे तुज वत्सा
गेली वर्षामागुनी वर्षे माग आता सत्वरी
तपोबल अधिकाधिक ते प्रसन्न मी तुजवरी"
होवूनी जड प्रुथ्वीला ऐकुनी ते बोल मधुर
आकाशा जाळीतसे उल्हसित मनी असुर
सांगे की ह्या भूवर (भाग २ पहा)
बुधवार, १५ एप्रिल, २००९
प्रीतीसागर
सागराच्या लाटा
धरतीला स्पर्शती प्रेमभावे
फेस सफेत उफाळे
मनीच्या प्रीतिचे जणू
धरती परी प्रतिसाद न देई
लाज वाटते तिला नभाची
लाजेची परी तिच्याच लाली
उठून दिसते क्षितिजावरती
जसा सूर्य आपुले तोंड लपवी
नगाआड वा पाण्याखाली
धरतीला स्पर्शती प्रेमभावे
फेस सफेत उफाळे
मनीच्या प्रीतिचे जणू
धरती परी प्रतिसाद न देई
लाज वाटते तिला नभाची
लाजेची परी तिच्याच लाली
उठून दिसते क्षितिजावरती
जसा सूर्य आपुले तोंड लपवी
नगाआड वा पाण्याखाली
शुक्रवार, १० एप्रिल, २००९
विनायक दामोदर सावरकर
शिक्षण घेण्या अनेक हिंदी विलायतेस गेले
बरेचजण त्यांपैकी परी ,मातृप्रेमास मुकले
एक असा विनायक त्यांपैकी जे देशप्रेमी ठरले,
राष्ट्राला समर्थ करण्यासाठी कटिबद्ध जाहले ।
क्रांतिज्योत पेटविण्या पुस्तकातुनी पिस्तूल पाठविले
धूर्त अशा आंग्लांच्या नजरेतुनी नच सुटले
शिक्षा काळ्या पाण्याची झाली,कष्ट किती भोगले
शरीर जर्जर झाले परे मन दुबळे नच झाले
युद्ध सुरु होता तरुणांस भरती होण्या सुचविले
भारत उद्याचा समर्थ व्हावा ,ह्या एकाच उद्देशाने
शिक्षा संपुनी घरी परतता स्वस्थ नाही बसविले
पतित पावन मंदिर बांधले ,जातिभेद मिटविले
राजकारण असे घडले ,क्षण एक लोक त्यांना विसरले
राष्ट्रप्रेम तरीही त्यांचे मुळी न ओसरले
आज तयांच्या पुण्यातिथीला पुन्हा स्मरु त्यांना
दिव्य भव्य त्या राष्ट्रभक्तीला देवू मानवंदना
बरेचजण त्यांपैकी परी ,मातृप्रेमास मुकले
एक असा विनायक त्यांपैकी जे देशप्रेमी ठरले,
राष्ट्राला समर्थ करण्यासाठी कटिबद्ध जाहले ।
क्रांतिज्योत पेटविण्या पुस्तकातुनी पिस्तूल पाठविले
धूर्त अशा आंग्लांच्या नजरेतुनी नच सुटले
शिक्षा काळ्या पाण्याची झाली,कष्ट किती भोगले
शरीर जर्जर झाले परे मन दुबळे नच झाले
युद्ध सुरु होता तरुणांस भरती होण्या सुचविले
भारत उद्याचा समर्थ व्हावा ,ह्या एकाच उद्देशाने
शिक्षा संपुनी घरी परतता स्वस्थ नाही बसविले
पतित पावन मंदिर बांधले ,जातिभेद मिटविले
राजकारण असे घडले ,क्षण एक लोक त्यांना विसरले
राष्ट्रप्रेम तरीही त्यांचे मुळी न ओसरले
आज तयांच्या पुण्यातिथीला पुन्हा स्मरु त्यांना
दिव्य भव्य त्या राष्ट्रभक्तीला देवू मानवंदना
शनिवार, ४ एप्रिल, २००९
कोंकणचा मेवा
टीप :-कोंकण हे नैसर्गिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकास पावत आहे ,बालांना त्याचे आकर्षण कसे वाटेल ह्यासंबंधी एक विचार ।
गावारानीचा हां मेवा
काजूकंदाचा घ्यावा
बालागोपाला वाटावा
जिवेभावे ,
हापूस आंब्याकडे मात्र
नुसतेच बघावे
मोठ्या आशेने
गावारानीचा हां मेवा
काजूकंदाचा घ्यावा
बालागोपाला वाटावा
जिवेभावे ,
हापूस आंब्याकडे मात्र
नुसतेच बघावे
मोठ्या आशेने
शुक्रवार, ३ एप्रिल, २००९
नव्या शतकाच्या अपेक्षा (मिलेनीयम)
पहांतेचेवाजले चार ३१स्त दीसेम्बर 1999
चोरीस गेली आमची कार
झाडावरचे कावळे चार
ओरडू लागले कार कार
विसाव्या शतकातले कावळे हुशार
बोलत नाहीत नुसते काव काव
बदलले पाहिजे त्यांचे नाव ।
एकविसाव्या शतकातले त्याहून गुणी
काय काय बोलतील सांगावे कुणी
कार दिसताच म्हणतील कदाचित
स~म्त्रो स~म्त्रो ,मातीझ मातीझ
चोरीस गेली आमची कार
झाडावरचे कावळे चार
ओरडू लागले कार कार
विसाव्या शतकातले कावळे हुशार
बोलत नाहीत नुसते काव काव
बदलले पाहिजे त्यांचे नाव ।
एकविसाव्या शतकातले त्याहून गुणी
काय काय बोलतील सांगावे कुणी
कार दिसताच म्हणतील कदाचित
स~म्त्रो स~म्त्रो ,मातीझ मातीझ
मंगळवार, ३१ मार्च, २००९
नोट सो ओल्ड ,एक आठवला म्हणुन
घरी परतता प्रसन्न मन हो अंत नुरे मम हर्षा
पहाता स्मित हास्य वदनी प्रियेच्या नाव तियेचे वर्षा
सवाल जवाब
मिरचित मिरची रेडियो मिरची
तिखट नव्हे गोड, वर्षा आमची
वर्षा:- रेडिओत रेडियो ओल इंडिया रेडिओमध्ये
माझ्या नावाची पब्लिसिटी ,करती हेमंत आमचे
पहाता स्मित हास्य वदनी प्रियेच्या नाव तियेचे वर्षा
सवाल जवाब
मिरचित मिरची रेडियो मिरची
तिखट नव्हे गोड, वर्षा आमची
वर्षा:- रेडिओत रेडियो ओल इंडिया रेडिओमध्ये
माझ्या नावाची पब्लिसिटी ,करती हेमंत आमचे
रविवार, २९ मार्च, २००९
chaaMdrayaan2008
झेपावले चंद्राकडे यान आज भारताचे
पूर्णपणाने यश मिळविले इस्रोने साचे
तीन ध्वज आजवरी फदकले तीन राष्ट्राम्चे
सांगेल तिरंगा सख्य असावे सर्व मानावाम्चे
पूर्णपणाने यश मिळविले इस्रोने साचे
तीन ध्वज आजवरी फदकले तीन राष्ट्राम्चे
सांगेल तिरंगा सख्य असावे सर्व मानावाम्चे
मंगळवार, १७ फेब्रुवारी, २००९
मकर संक्रांति
नेमेचे येईल मकरासंक्रमण
सणाचा न इतुका मान
परी त्यायोगे होई रुतूचे ज्ञान
सांगेल की संपले सुर्याचे दूरागमन
निमित्त होइल मकर संक्रांतिचे
तिळ्गुळ देऊंन मैत्री सधण्यासाठी
तिळतिळने स्नेह वाढतो
गुळ स्नेहास आणतो गोड़ी
संख्या ही वाढेल मित्रांची
गोड़ी येइल जीवनासी
हां भाग संस्काराचा
जीवनास देई उजाळा
उच्च ध्येयाने होउनी
कसोशीने तुम्ही पाळा
सणाचा न इतुका मान
परी त्यायोगे होई रुतूचे ज्ञान
सांगेल की संपले सुर्याचे दूरागमन
निमित्त होइल मकर संक्रांतिचे
तिळ्गुळ देऊंन मैत्री सधण्यासाठी
तिळतिळने स्नेह वाढतो
गुळ स्नेहास आणतो गोड़ी
संख्या ही वाढेल मित्रांची
गोड़ी येइल जीवनासी
हां भाग संस्काराचा
जीवनास देई उजाळा
उच्च ध्येयाने होउनी
कसोशीने तुम्ही पाळा
मंगळवार, १० फेब्रुवारी, २००९
रेतिनावारील क्रैक
ढगास पडावे छिद्र ,वा कोपावा सूर्ये
अन व्हावी प्रकाशगळती,महाभयंकर जळती
दिल्ली नेत्रांची आहुती ,परी प्रकाश जावूनी पुढती
मेंदूच्या नसानसा जळती
दिसेना कोणतेच चित्र हे झाले कसे विचित्र
हे तर साधे,म्हणे नेत्रतज्ञ
तुमच्या रेटिनासपडली चीर
म्हणून साहावेना प्रकाश
हे आम्हा नवीनच ज्ञान
परी एक चांगले झाले
काही न दिसता लिहिता आले
दूसरा मिल्टन आला म्हणूनी
चित्त समाधान पावले -कृष्णकुमार
अन व्हावी प्रकाशगळती,महाभयंकर जळती
दिल्ली नेत्रांची आहुती ,परी प्रकाश जावूनी पुढती
मेंदूच्या नसानसा जळती
दिसेना कोणतेच चित्र हे झाले कसे विचित्र
हे तर साधे,म्हणे नेत्रतज्ञ
तुमच्या रेटिनासपडली चीर
म्हणून साहावेना प्रकाश
हे आम्हा नवीनच ज्ञान
परी एक चांगले झाले
काही न दिसता लिहिता आले
दूसरा मिल्टन आला म्हणूनी
चित्त समाधान पावले -कृष्णकुमार
रविवार, १ फेब्रुवारी, २००९
आय ऍम सोरी
"आय ऍम सोरी,कविता आम्हाला येत नाही बुवा ",
असे तुम्ही म्हणू नका, जरासे बाहेर डोकवा ,
आणि ऐका,वारा म्हणतोय लोरी।
वृक्ष अन वेली ,गेली गाढ़ झोपी
कळीची मात्र ती पाही उडाली टोपी ।
कली पहा उमलली कशी हळूच लाजत ,
मुखकमल सुंदर आपले जगाला उघडून दाखवत
सुगंध तिचा पसरे वार्यासराशी उड़त
आवतन देई मधमाशांना भ्रमरासंगत
अरसिकांना सुद्धा निसर्गाची ही गम्मत
कविता करायला नाही का सांगत
असे तुम्ही म्हणू नका, जरासे बाहेर डोकवा ,
आणि ऐका,वारा म्हणतोय लोरी।
वृक्ष अन वेली ,गेली गाढ़ झोपी
कळीची मात्र ती पाही उडाली टोपी ।
कली पहा उमलली कशी हळूच लाजत ,
मुखकमल सुंदर आपले जगाला उघडून दाखवत
सुगंध तिचा पसरे वार्यासराशी उड़त
आवतन देई मधमाशांना भ्रमरासंगत
अरसिकांना सुद्धा निसर्गाची ही गम्मत
कविता करायला नाही का सांगत
शुक्रवार, ३० जानेवारी, २००९
हे कोण इथे निजलेले
दगडाच्या उशीला धुळीची खोळ ना
भूमीला बसे हादरा ,नियती हलवी पाळणा
सल्असळ पानांची होते, वारा गातो पाळ णा
रातराणीचे फुले डंवरती, त्यांची होते माळ ना
लुकलुकचाम्दान्या तय जणू डोळे मिचाकावती
तेवढ्याने का कोठे झोपा बाळांच्या उड़ती
जडावले डोंगर ,पापणीवरी केस गवतांचे
एकमेका भेटती ,गळामिठी सुटेल ना त्यांची
रात्र परी संपता संपता ,दव कोणीशिंपडले,
थेंबे पापणी ओलावता ,डोळे हळूच उघडले
सूर्यकिरण सोनेरी दिसता तेही चमकले
किलबिल पक्ष्यांची सारया ऐकुनी कोणी हेलावले
निद्रित होती सारी सृष्टी ,नव्हती कसली भीती
उजाडताना परी म्हणाली,भ्याले बाई मी किती
बाळे माझी दिसेनात ती,काय केले उपद्व्याप
धूर आकाशाला भिडतो ,जळतेमाता ,दू:खी बाप
भूमीला बसे हादरा ,नियती हलवी पाळणा
सल्असळ पानांची होते, वारा गातो पाळ णा
रातराणीचे फुले डंवरती, त्यांची होते माळ ना
लुकलुकचाम्दान्या तय जणू डोळे मिचाकावती
तेवढ्याने का कोठे झोपा बाळांच्या उड़ती
जडावले डोंगर ,पापणीवरी केस गवतांचे
एकमेका भेटती ,गळामिठी सुटेल ना त्यांची
रात्र परी संपता संपता ,दव कोणीशिंपडले,
थेंबे पापणी ओलावता ,डोळे हळूच उघडले
सूर्यकिरण सोनेरी दिसता तेही चमकले
किलबिल पक्ष्यांची सारया ऐकुनी कोणी हेलावले
निद्रित होती सारी सृष्टी ,नव्हती कसली भीती
उजाडताना परी म्हणाली,भ्याले बाई मी किती
बाळे माझी दिसेनात ती,काय केले उपद्व्याप
धूर आकाशाला भिडतो ,जळतेमाता ,दू:खी बाप
रविवार, २५ जानेवारी, २००९
अपुला भारत एक
बंध गुलामीचे तुटले ,तरी राहिला एकच धागा
राष्ट्रकुलातून अंग काढता ,परंतु तुटला तोही धागा
अठवण परकी साम्राज्याची , पुसून गेली पूर्णपणे ,
भारत स्वतंत्र प्रजासत्ताक होता वाटे आम्हा काय उणे
एकसंघ जरी भारत होता ,जुळली होती काय मने?
शंका अजुनी मनात येते ,गाजर पुढती कसले होते ?
स्वतंत्र होता ,करू या आपण ,रचना भाषावार ही
भुलाविन्यास कुणी होते ,विसरलो आपण ते नाही
पोटीरामुल्लूचा जीवच गेला उपोषणाला बसाला असता
तेलंगणाला हो म्हणण्याविन उपाय मग राही कोणता
सुरु जाहले तुकडे पडणे,जो उठला तो मातृभाशेचा दावी बडगा
मुंबई प्रांतातून मराठी वेगले करण्यासाठी झाला ग़लगा।
चळ्वळ दडपून टाकण्या,झडल्या फैरी, हुतात्मे झाले एकशे सात
जखमींची तर गणना नाही, भारत रडला दुनिया दाखवी दात्
आज पुन्हा ध्वजा तिरंगी ,करुन वंदना नम्रपणे
निश्चय करू या राष्ट्रभक्ती चा एकवतता आम्हा काय उणे .
राष्ट्रकुलातून अंग काढता ,परंतु तुटला तोही धागा
अठवण परकी साम्राज्याची , पुसून गेली पूर्णपणे ,
भारत स्वतंत्र प्रजासत्ताक होता वाटे आम्हा काय उणे
एकसंघ जरी भारत होता ,जुळली होती काय मने?
शंका अजुनी मनात येते ,गाजर पुढती कसले होते ?
स्वतंत्र होता ,करू या आपण ,रचना भाषावार ही
भुलाविन्यास कुणी होते ,विसरलो आपण ते नाही
पोटीरामुल्लूचा जीवच गेला उपोषणाला बसाला असता
तेलंगणाला हो म्हणण्याविन उपाय मग राही कोणता
सुरु जाहले तुकडे पडणे,जो उठला तो मातृभाशेचा दावी बडगा
मुंबई प्रांतातून मराठी वेगले करण्यासाठी झाला ग़लगा।
चळ्वळ दडपून टाकण्या,झडल्या फैरी, हुतात्मे झाले एकशे सात
जखमींची तर गणना नाही, भारत रडला दुनिया दाखवी दात्
आज पुन्हा ध्वजा तिरंगी ,करुन वंदना नम्रपणे
निश्चय करू या राष्ट्रभक्ती चा एकवतता आम्हा काय उणे .
शुक्रवार, २३ जानेवारी, २००९
भूपाली
पहाम्टे पहाम्टे मला जाग आली
पहाता पहाता भू दंवात न्हाली
आई नहात असता सुते दारी बसावे
बाहेरुनी येत असता पित्यासही थोपवावे
इथे कोणते दार वा पिता कोण ते कळेना
मनी दाट अंधार ,जगाचे कूट उकलेना
स्नान उरकुनीशाली चन्द्रमा ल्याली
सर्वांगी सुंदर चांदण्यांचे नक्षीकाम भारी
परी चांदण्या एकेककुठे लुप्त होती
जसे आसमंत उजळुनी,स्वागता सिद्ध हो ती
रवि प्रवेशिता लाल जणू तापलेला
महाभारती कर्णवध नच भावलेला
सांगणार त्यास कोण नियमांचा पालनकर्ता
दंडनीय मंत्रीसुतही कुमार्गी ,ही तर आचारसंहिता
पहाता पहाता भू दंवात न्हाली
आई नहात असता सुते दारी बसावे
बाहेरुनी येत असता पित्यासही थोपवावे
इथे कोणते दार वा पिता कोण ते कळेना
मनी दाट अंधार ,जगाचे कूट उकलेना
स्नान उरकुनीशाली चन्द्रमा ल्याली
सर्वांगी सुंदर चांदण्यांचे नक्षीकाम भारी
परी चांदण्या एकेककुठे लुप्त होती
जसे आसमंत उजळुनी,स्वागता सिद्ध हो ती
रवि प्रवेशिता लाल जणू तापलेला
महाभारती कर्णवध नच भावलेला
सांगणार त्यास कोण नियमांचा पालनकर्ता
दंडनीय मंत्रीसुतही कुमार्गी ,ही तर आचारसंहिता
रविवार, १८ जानेवारी, २००९
मात्रुवंदना
आस्तां तावदियं प्रसूति समये दुर्वार शूलव्यथा
नैरुच्ये तनुशोषणं मलमयी शय्या च सावंत्सरी
एकस्यापि न गर्भभार्भरण क्लेशस्य यस्यां: क्षमां
यातुम् निष्कृति मुन्नतो$पि तनय: तस्यै जननै नम:
gujarati anuwaada
माँ ,ते दू: सहा वेदना प्रसवनी जे भोगवी ना गणु
काया दीपनिचोती ना कहू भले धोई बाखोतिया
आ जे एक ज भार मासानव ते वेठ्यो हुं तेनु रुण
पाम्यो उन्नति ते ना भरी शकु ते माँ ताने हुं नमु
नैरुच्ये तनुशोषणं मलमयी शय्या च सावंत्सरी
एकस्यापि न गर्भभार्भरण क्लेशस्य यस्यां: क्षमां
यातुम् निष्कृति मुन्नतो$पि तनय: तस्यै जननै नम:
gujarati anuwaada
माँ ,ते दू: सहा वेदना प्रसवनी जे भोगवी ना गणु
काया दीपनिचोती ना कहू भले धोई बाखोतिया
आ जे एक ज भार मासानव ते वेठ्यो हुं तेनु रुण
पाम्यो उन्नति ते ना भरी शकु ते माँ ताने हुं नमु
शुक्रवार, १६ जानेवारी, २००९
मोंती बिंदु
एक बाहुली सोडुनी जाता,माझा डोळा होई व्याकुळ,
नवी बाहुली करी लाल त्या रंग तिचा जरी घननीळ।
निसर्गाची अमोल देणगी टी तर ह्याला सोडुनी गेली ,
नववधू जणू घरी आणली ,ही तर प्लास्टीकची बाहुली
रडत मुरडत घरी आली ती बाहुली जरी प्लास्टीकची।
असला बनाली प्लास्टीकची ,तरी साथ देवो मज अखेरची
नवी बाहुली करी लाल त्या रंग तिचा जरी घननीळ।
निसर्गाची अमोल देणगी टी तर ह्याला सोडुनी गेली ,
नववधू जणू घरी आणली ,ही तर प्लास्टीकची बाहुली
रडत मुरडत घरी आली ती बाहुली जरी प्लास्टीकची।
असला बनाली प्लास्टीकची ,तरी साथ देवो मज अखेरची
रविवार, ११ जानेवारी, २००९
सुखाचे स्वप्न
एका क्षणी तुझ्या मणी आहे
कोणाची तरी राणी होण्याचे स्वप्न
तर दुसर्या क्षणी ते स्वप्नच होते
हे कळताचतुझ्या नयनी आहे पाणी
सुखहे असेच क्षणभराचे स्वप्न आहे
ते केव्हा संपून निराशेचे ढग येतील
ते कुणालाच कधी सांगता येणार नाही
येणारे वादळ मनाचे गलबत केव्हा उलटवील
काही भरवसा नाही
कोणाची तरी राणी होण्याचे स्वप्न
तर दुसर्या क्षणी ते स्वप्नच होते
हे कळताचतुझ्या नयनी आहे पाणी
सुखहे असेच क्षणभराचे स्वप्न आहे
ते केव्हा संपून निराशेचे ढग येतील
ते कुणालाच कधी सांगता येणार नाही
येणारे वादळ मनाचे गलबत केव्हा उलटवील
काही भरवसा नाही
बुधवार, ७ जानेवारी, २००९
hemMt rutuIcontinued)
मुर्छित हे मन क्षुधितशुष्क हो तन,हरपली वाणी
वृक्ष स्तब्ध अन लता पर्णहीन,जीवन्म्रुत हे प्राणि
(मूल हिन्दी काव्य कुवर चंद्रप्रकाशसिहं याचे रुपांतर)
वृक्ष स्तब्ध अन लता पर्णहीन,जीवन्म्रुत हे प्राणि
(मूल हिन्दी काव्य कुवर चंद्रप्रकाशसिहं याचे रुपांतर)
हेमंत रुतु
आजा होउनी क्रोधित वायु ,मारी चाबुक शाहार्याचा
गीताचे मम शब्द गोठले ध्वनि थड्थड हाडांचा
निरांकुश हे बसले शासन बसले दडपुनि मीतूपणा
हिमावर्शावे तुतली गात्रे भंगुनी या जीवना
murchhita
गीताचे मम शब्द गोठले ध्वनि थड्थड हाडांचा
निरांकुश हे बसले शासन बसले दडपुनि मीतूपणा
हिमावर्शावे तुतली गात्रे भंगुनी या जीवना
murchhita
शुक्रवार, २ जानेवारी, २००९
हुरहूर (दिसम्बर १,२००१)
चिंब भिजुनी प्रेमाने या उत्तररात्री
जपशील स्मृती प्रेमाची याची देशील काय खात्री
थेम्बा पाण्याचा जसा राहीना अळवाच्या पानावर
तसा तू प्रिया नाहीना प्रीतीस विसरणार
मी प्रेमिका तुझी ना आजपुरती
जीवनाचे प्रेमरूपी यज्ञ्नात दिली आहुती
मला ना अता वळुनपाह्याचे मागे
धुंदीत प्रीतीच्या तुझ्या सदा पुढेच जायचे
मनी परी कधी ही पाल शंकेची चूकचुके
की तुझी भूमिकाही अशीच असला ना गडे
मला फसवुनी तू कधी नाहीसा होशील का रे
मधु शोषुनी भ्रमर उडून जातो तसा रे
ते फूल अल्पसंतुष्ट (बीजांडावरी) रमते स्वकेसरी
प्रेमिका मातृ आठवे प्रियकरा जन्मजन्मांतरी
जपशील स्मृती प्रेमाची याची देशील काय खात्री
थेम्बा पाण्याचा जसा राहीना अळवाच्या पानावर
तसा तू प्रिया नाहीना प्रीतीस विसरणार
मी प्रेमिका तुझी ना आजपुरती
जीवनाचे प्रेमरूपी यज्ञ्नात दिली आहुती
मला ना अता वळुनपाह्याचे मागे
धुंदीत प्रीतीच्या तुझ्या सदा पुढेच जायचे
मनी परी कधी ही पाल शंकेची चूकचुके
की तुझी भूमिकाही अशीच असला ना गडे
मला फसवुनी तू कधी नाहीसा होशील का रे
मधु शोषुनी भ्रमर उडून जातो तसा रे
ते फूल अल्पसंतुष्ट (बीजांडावरी) रमते स्वकेसरी
प्रेमिका मातृ आठवे प्रियकरा जन्मजन्मांतरी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)